कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव…या सभागृहाचे उद्घाटन होणार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात ब्राह्मण सभेच्या वतीने आ.आशुतोष काळे यांच्या १० लाख रुपयांच्या स्थानिक निधीतून उभारलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन व शैक्षणिक विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा व समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा उद्या रविवार दि.२८ जुलै रोजी दुपारी ०४ वाजता लक्ष्मीनगरच्या मागे ब्राम्हण सभागृहात आयोजित केला असल्याची माहिती सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी खा.प्रा.मेघाताई विश्राम कुलकर्णी या रहाणार आहेत.

कोपरगाव शहरात ब्राह्मण सभेच्या वतीने आ.आशुतोष काळे यांच्या १० लाख रुपयांच्या स्थानिक निधीतून उभारलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन व शैक्षणिक विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा व समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा संपन्न होत आहे.
सदर कार्यक्रम आ.आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असून त्यास माजी आ.स्नेहलता कोल्हे या,खा.भाऊसाहेब वाकचौरे,कोपरगाव नगर परिषदेचे माजी अध्यक्ष संजय सातभाई,मुख्याधिकारी सुहास जगताप,प्रतिभाताई संगमनेरकर प्रमुख उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्राम्हण संघाचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांनी शेवटी केले आहे.