जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात आ.काळे-कोल्हेचा फुकटचा तमाशा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरात जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे उदघाटन करण्यावरून आज प्रस्थापित आ.आशुतोष काळे व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या गटात अकाली शिमगा साजरा झाला असून तेथील श्रेयवादी फलकावरून एकमेकास दूषणे देण्यासह मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना फैलावर घेतले असून यात दोन्ही नेत्यांनी एकमेकास धम्मक्या देण्यासह अनेक ठिकाणचे श्रेयवादाचे फलक फाडण्यासह ‘पुष्पा’ या हिंदी चित्रपटातील मर्कटलीला करून आपले सिद्धता दाखवली आहे.तर दुसरीकडे अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून अंगावर जाण्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करून हस्तक्षेप करावा लागला असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने आज स्वातंत्र्य दिनाचा गवारेनगर व शंकरनगर आदी उपनगरातील नागरिकांना ‘फुकटचा तमाशा’ पाहायला मिळाला असल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर पुढील अनर्थ टळला असता असे अनेकांचे म्हणणे आहे.त्यामुळे पोलिसांच्या या लेच्यापेच्या भूमिकेने शहर आणि तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.व अनेकांनी यापूर्वीचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या धडक कार्याची आठवण केली आहे.अनेक पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या कारवाईला घाबरून सहसा पुढे यायला धजावत नसत.

कोपरगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोपरगाव शहराच्या लगत अनेक छोटी-मोठी उपनगरे वसलेली असून उत्तरोत्तर ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.या उपनगरातील नागरिकांना शहरातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या रस्ते,पाणी,वीज,आरोग्य,भूमिगत गटारी आदी सुविधा मिळणे गरजेचे होते.त्यामुळे ज्याप्रमाणे मागील जवळपास चार वर्षात कोपरगाव शहराचा विकास झाला त्याप्रमाणेच या उपनगरांचा देखील सर्वांगीण विकास होवून नागरिकांना सर्व मुलभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी नागरिकांची मागणी होती.त्याबाबत या उपनगरांच्या विकासासाठी निधी मिळावा याबाबत आ.काळे हे पाठपुरावा करीत होते.त्या पाठपुराव्याला यश येऊन त्यांनी दहा कोटी रुपये मंजुर झाल्याच्या बातम्या दि.२६ जुलै रोजी प्रसिद्ध केल्या होत्या.

सकाळी ०९ वाजता कोल्हे गटाचे कार्यकर्ते वैभव गिरमे व दीपक जपे,सुरेश बोळीज आदीनीं भूमिपूजन केले त्याचे छायाचित्र.याच ठिकाणी दुपारी राडा झाला आहे.

महायुती शासनाने कोपरगाव शहराच्या लगत हद्दवाढ झालेल्या भागात वसलेल्या नाईकनगर,सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी,सोसायटी,गोकुळ नगरी,शंकर नगर मागील पवार वस्ती,ओम नगर,गवारे नगर,गवारे वस्ती,अयोध्या नगरी,धोंडीबानगर,हनुमाननगर,पवार वस्ती आदि उपनगरांसाठी तसेच हद्दवाढ झालेल्या इतर भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून स्वतंत्र १० कोटी निधी मंजूर केला आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील रस्ते,पाणी, वीज,आरोग्य,शहर सुशोभिकरण,भूमिगत गटारी आदी कामांचे भूमिपूजन आज सकाळ पासून सुरु होते.दुपारी गवारे नगर या उपनगरात खडकी रोड वर त्याचे भूमीपूजन संपन्न होत असताना त्या आदी माजी आ.कोल्हे गटाच्या काही कार्यकर्त्यानी त्या रस्त्याचे भूमीपूजन आज वरील आदेशबर हुकूम फलक लावून मोठ्या उत्साहात केले होते.मात्र दुपारी त्याच कामावर आ.काळे गटाचे कार्यकर्ते यांनी कोल्हे गटाच्या फलकासमोर आ.काळे गटाचा फलक लावून शिरजोरी केल्याचा कोल्हे गटाचा आरोप होता.त्यावरून रान पेटले असून त्या ठिकाणी दोन्ही गटांचे प्रमुख कार्यकर्ते एकत्र आले व त्याचा वादाचा श्री गणेशा झाला असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान आपले सहकारी साखर कारखाने गुपचूप व बिनविरोध करताना हि नेते मंडळी नेहमी स्रेयवादात रमताना दिसत असून २००४-०५ साली मढी बुद्रुक येथे असाच पुलाचे उदघाटन करताना माजी आ.अशोक काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यात असाच तमाशा झाला होता.त्यावरून तर गुन्हे दाखल झाले होते.त्याची आठवण ताजी झाली आहे.दरम्यान सदर ठिकाणी आ.काळे गटाने सदर फ्लेक्स काढून घ्यावा अशी मागणी कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली असता त्यास त्यांनी नकार दिला होता.त्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी भुमीपूजन केले व ते निघून समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे घराजवळ गेले असता दोन्ही गट एकमेकास भिडले असल्याची माहिती त्यांना मिळाली असता ते गेल्या पावली परत आले होते.तोवर दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले होते.आधी इकडे संजीवनी गडावरही हा वाद पोहचून विवेक कोल्हे यांना या ठिकाणी पाचारण केले असता दोन्ही बाजूनी कार्यकर्त्यानी आपापल्या नेत्याना खांद्यावर घेऊन,”दादा तूम आगे बढो’ हम तुम्हारे साथ है” ची घोषणाबाजी सुरु केली होती.त्यामुळे दोन्ही गटांचा जोश उच्च पातळीवर पोहचला होता.त्यातच दोन्ही गट मागे सरकण्याचे नाव घेईना.त्यातच मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर बसून आल्याचा बिनपुराव्याचा राग भाजप कोल्हे गटास आल्याने त्यावर आल्या-आल्या विवेक कोल्हे यांनी तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश नसताना भूमिपजन केलेच कसे असे प्रश्न विचारून गोसावी यांना हैराण केले.त्यावेळी गोसावी यांनी,”लोकप्रतिनिधींनी बोलावल्यावर जावे लागते असा बचाव केला आहे.तर त्यांच्या दिमतीला आधीच असलेले त्यांचे किल्लेदार पराग संधान यांनी,”आमचा फोन तुम्ही का उचलत नाही,”तुम्ही कोणाच्या इशाऱ्यावर काम करता ? तुम्ही थेट राष्ट्रवादीच्या दिमतीला गेले असल्याचा आरोप करून आता तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश कावा आम्ही तुमच्या अभिनंदनाचा फलक लावतो” असा बिनपुराव्याचा शालोजोडा लगावला आहे.”तुम्हाला सकाळी ११ नंतर दुपारी ०४ पर्यंत फोन करूनही तुम्ही तो उचलला नाही.त्यासाठी त्यासाठी संधान यांनी स्वतःच्या मोबाईलचा पुरावा सादर केल्याचे दिसून आले आहे.त्यानंतर तुमच्या केबिनला कोण बसलेले असते ? अशी प्रशांची सरबत्ती केली होती.त्यावर सहनशीलता संपलेल्या मुख्याधिकारी गोसावी यांनी,”कोण बसते काहीही काय बोलता ? असा प्रतिसवाल केला असता विवेक कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कपाळावरील शिरा तडतडल्या असल्याचे दिसून आले आहे.त्या दरम्यान दोन्ही नेते आमने सामने आल्याने त्यांनी एकमेकास आव्हान दिले आहे.तर त्यातील आ.आशुतोष काळे यांनी ‘पुष्पा’ या हिंदी चित्रपटातील संवाद ऐकवत व मानेवर सपाट हाताची आडवी खून करत,झुकेगा नही साला” अशी देहबोली असलेली कृती केल्याने आणखी रान पेटले होते.तर त्याच वेळी कुस्तीतील फडात असलेला पहिलवान जसे दंड थोपटतो असे वर्तन केले आहे.त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

त्या दरम्यान याच वेळी अक्षय अहिरे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने तर थेट भाजप कोल्हे गोटात जाऊन कोल्हे यांच्या समोर आ.आशुतोष काळेंच्या जयघोष करून धांदल उडवून दिली आहे.त्यावेळी विवेक कोल्हे यांचा तोल गेला व त्यांनी त्या कार्यकर्त्याची गचांडी पकडून त्यास दूर ढकलले असल्याची बातमी आहे.तर दुसरीकडे कोल्हे यांनी पोलिसांनी मध्यस्ती केल्याने लोढा मंगल कार्यालयाच्या बाजूने काढता पाय घेतला असता काळे गटाच्या कार्यकर्त्यांना आणखी चेव आला होता.त्यावेळी त्यांनी फटाके फोडून,गुलालाची उधळण करत शंकरनगर येथे कूच केले आहे. व त्या ठिकाणी सुनील गंगूले बोलताना म्हणाले की,” आज सोडले यापुढे अंगावर आले तर सोडणार नाही” असा इशारा दिला आहे.त्यामुळे आगामी काळात नगरपरिषद,लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणूका असल्याने हा ‘फुकटचा तमाशा’ आगामी काळात सुरु राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close