जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

‘लव्ह जिहाद’ प्रश्नी कोपरगावात होणार हे आंदोलन!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरात लव्ह जिहादच्या प्रकार उघड झाला असून हिंदू संघटना जाग्या झाल्या असल्याचे दिसून येत असून त्यांनी आज दुपारी ०३ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली असून आगामी गुरुवार दि.२० जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर जमून,’हिंदू जनाक्रोश मोर्चा’चे आयोजन केले असल्याची माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनी दिली आहे.

दोन्ही संकल्पित छायाचित्र.

दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यातील जनता येथील दोन सहकार सम्राटांच्या गटात विभागली गेली आहे.ती त्यांच्या मागे उभी राहात असली तरी सदर नेते हिंदू समाजावर आपत्ती आल्यावर मात्र मागे उभे रहाण्याच्या नेमक्या वेळी गायब होण्यात पटाईत आहे.मात्र अल्पसंख्यांकांच्या मागे उभे राहण्यात व आर्थिकसह कोणतीही मदत करण्यास कसर सोडत नाही एवढेच नाही. तर मालमत्ता नुकसानीस प्रोत्साहित करण्याचा इतिहास फार जुना नाही.त्यांनी अद्याप या घटनेवर एक चकार शब्द काढला नाही की,एक ढबूची मदत तीनही प्रमुख नेत्यांसह अन्य प्रमुख आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी केली नाही हे विशेष !

‘लव्ह जिहाद’चा कायदा मागील काही दिवसांपासून खुपच चर्चेला आला असून.महाराष्ट्रात सुध्दा हा कायदा करण्यात येणार अशा चर्चा महाराष्ट्रात चालू झाल्या आहेत.मात्र या आगोदर हा कायदा उत्तर प्रदेश,हरियाणा,कर्नाटक,मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागू आहे.मात्र महाराष्ट्रात मात्र,’केवळ आश्वासनाची बोळवण केली जात आहे.त्यातच अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात नुकतीच घडली आहे.कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुलीला (वय-२०वर्षे) तिच्या भ्रमणध्वनी वरून संपर्क करून व मैत्रीचे नाटक केले व तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दि.२१ मे रोजी सकाळी ०६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आरोपी सायम कुरेशी याने तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.व त्यानंतर तिला कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकाच्या बाहेर बोलावून तिला खडकी येथील मदरसा येथे येण्यास सांगितले असता तिने त्यांना त्याबाबत विरोध केला असता इंदोर येथील आरोपी सायन शहाबुद्दीन कुरेशी याने शहरातील काही आरोपींच्या सहाय्याने हात पाय बांधून फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व तिला तिच्याच दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून खडकी कोपरगाव येथील मदरसा येथे नेऊन आरोपी सायम कुरेशी याने तिच्या मर्जीच्या विरुद्ध शरीर संबंध स्थापित करून त्याचे फोटो व चलचित्रण केले होते.त्यांनतर ते फोटो व चलचित्रण प्रसारित करण्याची धमकी देऊन फिर्यादिस इंदोर येथे बोलावुन घेतले होते.तेथे देखील आरोपीने तिच्या बळजबरीने शारीरिक अत्याचार करून इंदोर येथील मौलवीकडून धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणुन बळजबरीने नमाज पठण करण्यास लावले होते.तसेच धर्मांतरण करण्यासाठी फिर्यादी मुलीवर आरोपी सायम कुरेशी यांचे सोबत लग्न करण्यासाठी दबाव आणून वेळोवेळी फिर्यादीचे आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली होती.

दरम्यान यातील तीन आरोपी इमरान आयुब शेख (वय-३१) मोबाईल शॉपी,रा.आयेशा कॉलनी,फय्याज वहाब कुरेशी (वय-४५)रा.कोपरगाव,सायन शहाबुद्दीन कुरेशी (वय-१९),रा.साठ,जुना पिठा इंदोर मध्यप्रदेश आदींना अटक केली आहे.त्यांना कोपरगाव येथील अतिरिक्त वरिष्ठ न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि.१८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून उर्वरित आरोपीच्या शोधात दोन पोलीस पथके रवाना केले आहे.त्यांना लवकरच शोधले जाईल असा विश्वास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांनी दिला असताना कोपरगाव शहर आणि तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना जाग्या झाल्या असून त्यांनी जनजागृती सुरु केली आहे.दरम्यान आज छत्रपती शिवाजी महाराज पूतळ्यासमोर आज दुपारी ०३ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी नगरसेवक कैलास जाधव,शिवसेनेचे शहर प्रमुख सनी वाघ,माजी शहर प्रमुख कलविंदर दडियाल,भाजपचे शहर प्रमुख दत्ता काले,मनसेचे तालुका प्रमुख अनिल गायकवाड,संतोष चवंडके आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान या आधी संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तरूंणांना संगमनेर शहरात मारहाण केल्या नंतर त्या ठिकाणी मोठा भगवा मोर्चा आयोजित केला होता.त्यात आयोजकांवर गुन्हे दाखल केले होते.त्यामुळे शहरात किती नागरिक उपस्थित राहणार व नेमके काय घडणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close