कृषी व दुग्ध व्यवसाय
मधमाशा पालन उद्योगातील व्यक्ती, संस्थांसाठी पुरस्कार

न्यूजसेवा
अ.नगर- (प्रतिनिधी)
मुंबईच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी ७ मे २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी.आर.मुंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जागतिक मधमाशी दिनानिमित्त २० मे २०२३ रोजी महाबळेश्वर येथे हा पुरस्कार वितरणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सातेरी युनिट-३,मेलीफेरा युनिट-३,शास्त्रीय पद्धतीने आग्या मध संकलन-३ एकुण ९ पुरस्कार देण्यांत येणार आहे.रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मधमाशा पालन उद्योग करणारे उद्योजक, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, मध उद्योगाची माहिती प्रचार व प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्ती,संस्था यांच्याकडून विहीत नमून्यांत अर्ज मागविण्यांत येत आहे.
अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील राहिवासी असावा,मध उद्योगाचे प्रशिक्षण घेतलेला असावा,सदर क्षेत्रात कार्यरत असणारा असावा.पुरस्काराची निवड ही मंडळाने नेमलेल्या समिती सदस्यांकडून करण्यांत येणार आहेत. अधिक माहितीकरिता जिल्हा ग्राम उद्योग कार्यालय व मध संचालनालय, महाबळेश्वर जि. सातारा येथे संपर्क करावा. असे आवाहन ही श्री.मुंडे यांनी केले आहे.