जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी व दुग्ध व्यवसाय

कोपरगाव तालुक्यात..या ठिकाणी शेती शाळा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून मल्हारवाडी येथे शेती शाळेचे आयोजन उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीतमोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

शेतकरी जे पिक घेतात त्या पिकामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे शेती शाळा आहे.शेती शाळा ही प्रत्यक्ष शेतावर घेतली जाते.यासाठी प्रगतीशील शेतकरी यांचे एक एकर चे क्षेत्र निवडले जाते.या क्षेत्रावरच गावातील जवळपासचे त्या पिकाचे किमान २५ शेतकरी त्या हंगामात त्या पिकाच्या पेरणी पासून ते मळणी पर्यंत दर १५ दिवसांनी एकत्र येतात.या प्रकारे १० वर्ग शेतावरच आयोजित होतात.एक वर्ग किमान दोन तासाचा असतो.या शेती शाळेत कमीत कमी व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून अनुभवातून शिक्षण अभिप्रेत आहे.

शेतकरी जे पिक घेतात त्या पिकामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे शेती शाळा आहे.शेती शाळा ही प्रत्यक्ष शेतावर घेतली जाते.यासाठी प्रगतीशील शेतकरी यांचे एक एकर चे क्षेत्र निवडले जाते.या क्षेत्रावरच गावातील जवळपासचे त्या पिकाचे किमान २५ शेतकरी त्या हंगामात त्या पिकाच्या पेरणी पासून ते मळणी पर्यंत दर १५ दिवसांनी एकत्र येतात.या प्रकारे १० वर्ग शेतावरच आयोजित होतात.एक वर्ग किमान दोन तासाचा असतो.या शेती शाळेत कमीत कमी व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून अनुभवातून शिक्षण अभिप्रेत आहे.या निवडलेल्या क्षेत्रावर सुधारीत तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रात्यक्षिक आयोजित केले जाते.कोपरगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथे असे शिबिर नूकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

या प्रसंगी दत्तू गुंजाळ,मच्छिंद्र शिंदे,नंदू एलमामे,संजय वेताळ,बाबासाहेब रोडे,बाबासाहेब गुंजाळ, मनोहर गुंजाळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते

सदर शेती शाळेत मका व सोयाबीन पिकावर शेतीशाळा द्वारे मार्गदर्शन करण्यात येत असून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळत असून गावातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेती शाळाची मोठी मदत होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
या वेळी कृषी सहाय्यक सुनिल घारकर यांनी सोयाबीन पिकाच्या बियाणे उगवण क्षमता , बीजप्रक्रिया,पेरणी पद्धती,योग्य जातीच्या बियाणे ची निवड,पेरणी अंतर,पाणी व्यवस्थापन,खत व्यवस्थापन तसेच कीड व रोग याबत सविस्तर माहिती दिली आहे.तसेच या प्रसंगी महात्मा गांधीं रोजगार हमी योजना च्या माध्यमातून बांधावर आंबा,नारळ,सीताफळ यासारख्या फळपिके लागवड बाबत माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
सदर प्रसंगी कृषी पर्यवेक्षक विशाल साबदे यांनी मका पिकाच्या लागवड बाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
या प्रसंगी संपर्क शेतकरी बाबासाहेब गुंजाळ यांनी आपले शेतीशाळा बाबत अनुभव सांगितले.समारोपाच्या वेळी सर्व शेतकरी बांधवानी गावात वृक्षारोपण करण्याची ठरवून शेतीशाळा संपन्न झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close