कृषी व दुग्ध व्यवसाय
कर्मवीर कारखान्याचे ऊस देयके शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकारात अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप केलेल्या ऊसाचे प्र.मे.टन रुपये २२५ प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या जमा केले असूनयावर्षीच्या हंगामात हा दर ०२ हजार ७२५ रुपये ठरला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये एकूण ०५ लाख २४ हजार ९४७ मे.टन ऊसाचे गाळप केले आहे.इतर कारखान्यांना कराराने २७ हजार ९५९ मे.टन ऊस पुरवठा करून या गळीत हंगामात अशा एकूण ०५ लाख ५२ हजार ९०७ मे.टन ऊसास यापूर्वी पहिले पेमेंट ०२ हजार ५०० प्रमाणे ऊस गाळपासाठी आल्यानंतर पंधरा दिवसाचे आत शेतकऱ्यांना अदा केले आहे.
शेतकरी आज रोजी अडचणीत आहे.कांद्याला भाव नाही.बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा चाळीत सडू लागला आहे. कापूस व सोयाबीनचे दर देखील कमी झालेले आहे.केवळ ऊस पिकालाच एफ.आर.पी.प्रमाणे हमीभाव मिळतो.त्यामुळे खरीप हंगामात बी-बियाणे,रासायनिक खते इत्यादीसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिके उभी करण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाचा विचार करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती मे.टन रुपये २२५ प्रमाणे ऊस पेमेंट देण्याचा निर्णय घेवून सदरचे देयक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले असून पहिले पेमेंट रुपये ०२ हजार ५०० व हे २२५ असे एकूण ०२ हजार ७२५ रुपये प्रती मे.टन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केले असल्याची माहिती आ. काळे यांनी शेवटी दिली आहे.