जाहिरात-9423439946
कला व सांस्कृतिक विभाग

शिवजयंती चित्रकला स्पर्धा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथे शिवजयंती निमित्ताने सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने,’कोपरगाव फेस्टिव्हल’ अंतर्गत कोपरगाव तालुका कला़ध्यापक संघ, कोपरगाव,आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,बाल रंगभूमी परिषद यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव-२०२३ निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती सुशांत घोडके यांनी दिली आहे.

सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून २२ वर्षापासून शिवजयंती निमित्ताने लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजीराजे यांचा ईतिहास आणि विचार रुजविण्यासाठी चित्रकला स्पर्धा सह विविध उपक्रमांचे आयोजन विनामूल्य लोकसहभागातून करण्यात येते.यातील विजेते यांना बक्षीस वितरणाची तारीख,वेळ आणि ठिकाण विजेत्यांना कळविण्यात येईल असे आयोजकांनी शेवटी सांगितले आहे.

निकाल खालील प्रमाणे :-गट-अ (इ.१ ली २ री) प्रथम क्रमांक-राफे असलम शेख (श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय),द्वितीय क्रमांक – वशिका विलास परदेशी (विद्या प्रबोधिनी),तृतीय क्रमांक-सायली सागर पोटे (समता इंटरनॅशनल स्कूल),उत्तेजनार्थ-यज्ञेश वैभव रक्ताटे (आत्मा मालिक इंग्लिश मेडिअम),उत्तेजनार्थ-ईश्वरी महेश शिंदे (शारदा इंग्लिश मेडिअम)

गट-ब (इ.३ री ४ थी) प्रथम क्रमांक -क्रिशिका किशोर गवळी (संजीवनी अॅकेडमी),द्वितीय क्रमांक – वैष्णवी नारायण कहार (विद्या प्रबोधिनी),तृतीय क्रमांक -मनोहर कुवा-या वसावे (आत्मा मालिक इंटरनॅशनल), उत्तेजनार्थ -साक्षी राजेश हाबडे (श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय),उत्तेजनार्थ -इशिता रमेश आढाव (श्री शारदा इंग्लिश मेडिअम )

गट -क ( इ. ५ वी ६ वी) प्रथम क्रमांकपठा – जोया जावेद पठाण (एस.जी.विद्यालय) द्वितीय क्रमांक -शाहीद नवाज शेख (कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय,करंजी),तृतीय क्रमांक -अंकिता सोमनाथ पोटिंदे (आत्मा मालिक इंग्लिश मेडिअम गुरुकुल),उत्तेजनार्थ – साईशा नितीन शेटे(डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर),उत्तेजनार्थ -श्रेयस भानुदास अनाड (शारदा इंग्लिश मेडिअम स्कूल)

गट -ड (इ.७ वी८ वी) प्रथम क्रमांक – कृष्णप्रिया वासुदेव साळुंके ( श्री शारदा इंग्लिश मेडिअम स्कूल),द्वितीय क्रमांक -धनश्री दत्तात्रय लांडबिले(कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय, करंजी), तृतीय क्रमांक -अजय सिंग्या पावरा(आत्मा मालिक इंग्लिश मेडिअम गुरुकुल),उत्तेजनार्थ- सचिन प्रविण वरठा (आत्मा मालिक इंग्लिश मेडिअम गुरुकुल), उत्तेजनार्थ -साक्षी जिभाऊ वाघ (आत्मा मालिक इंग्लिश मेडिअम गुरुकुल)

गट – इ (इ. ९ वी – १० वी) प्रथम क्रमांक – ईश्वरी अनंत आव्हाड (श्री शारदा इंग्लिश मेडिअम स्कूल),द्वितीय क्रमांक -रिंकू अशोक ढोले (एस.जी.विद्यालय),तृतीय क्रमांक – रेणुका दिपक पाठक (संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडिअम स्कूल),उत्तेजनार्थ -पायल रावसाहेब बागुल (के.बी.पी.विद्यालय),उत्तेजनार्थ – स्वप्नाली नितीन बारवकर ( डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्या मंदिर)

गट -फ (खुला गट) प्रथम क्रमांक -किशोर अशोक भोसले,द्वितीय क्रमांक -सचिन गोविंद पाटसकर, तृतीय क्रमांक -नितीन ईश्वरलाल भोपळे (संजीवनी काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग),उत्तेजनार्थ – नईम इनायत अली शाद,उत्तेजनार्थ -कांचन दत्तात्रय अनाड ( संजीवनी आर्ट्स,काॅमर्स,सायन्स काॅलेज)

गट -ग) दिव्यांग (मुकबधीर) प्रथम क्रमांक – लिपिका भास्कर धिवर,द्वितीय क्रमांक – वैष्णवी गोरख राऊत,तृतीय क्रमांक -दिव्या अण्णासाहेब बोरसे,उत्तेजनार्थ -चैतन्य शिवाजी खेडकर,उत्तेजनार्थ -यश शाम कोळी ( दिव्यांग गटातील सर्व बक्षीस विजेते लायन्स मूक बधिर विद्यालय कोपरगाव)

प्रत्येक गटास स्वतंत्रपणे निसर्गाच्या देखावा, गड किल्ले,आवडता वन्यजीव,वृक्षारोपण आणि संवर्धन,स्वच्छ सुंदर हरित कोपरगांव, शिवकालिन लोककला,शिवरायांचे बालपण, ऐतिहासिक स्थळ,मर्दानी खेळ,स्वच्छ भारत अभियान,छत्रपती शिवाजीराजे आज असते तर…,शिवराज्याभिषेक सोहळा,रयतेचा राजा, दिव्यांगांना समजलेल्या छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग या प्रमाणे विषय ठेवण्यात आले होते.आयोजकांनी दिलेल्या कागदावर बाल चित्रकारांनी स्वच्छंदपणे चित्र रेखाटून रंगवले आहे.
        स्पर्धेचे परिक्षण कलाशिक्षक संदिप चव्हाण,अनिल अमृतकर,अतुल कोताडे,प्राजक्ता राजेभोसले यांनी केले आहे.
         बक्षीस विजेत्यांना सन्मानचिन्ह,झाडाचे रोप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वृक्ष संवर्धनाचे आज्ञापत्र आणि राजे लखुजीराव जाधव यांचे तथा माँसाहेब जिजाऊ यांचे माहेरचे वंशज श्रीमान शिवाजी दत्तात्रेय राजेजाधव तसेच भारत सरकार आयुष मंत्रालयाचे निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डाॅ.शिवरत्न शेटे यांची डिजीटल स्वाक्षरी असलेले सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.         
        सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून २२ वर्षापासून शिवजयंती निमित्ताने लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजीराजे यांचा ईतिहास आणि विचार रुजविण्यासाठी चित्रकला स्पर्धा सह विविध उपक्रमांचे आयोजन विनामूल्य लोकसहभागातून करण्यात येते.
           बक्षीस विजेत्यांचे आढाव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.हर्षद आढाव,सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके,कलाध्यापक संघाचे अध्यक्ष संदिप चव्हाण,स्पर्धा प्रमुख अतुल कोताडे,अमोल निर्मळ,विद्या प्रबोधिनीचे मुख्याध्यापक दत्तात्रय गवळी,सूर्यतेज संस्थेच्या लताताई भामरे,बी. एस.वाघ,प्रा.अनिल अमृतकर,प्राजक्ता राजेभोसले,वासंती गोंजारे,माया रक्ताटे,शिरिष धनवटे,अजय कांगणे,संदिप ठोके,रविंद्र भगत,महेश थोरात,अनंत गोडसे,अॅड.महेश भिडे आदींनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.बक्षीस वितरणाची तारीख,वेळ आणि ठिकाण विजेत्यांना कळविण्यात येईल असे आयोजकांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close