ऊर्जा विभाग
महावितरण कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठतेचे कौतुक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रारंभी प्रतिक्षा करावी लागलेल्या पावसाने सध्या राज्यभर दमदार हजेरी लावली असुन,विजांचा लखलखाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन होत असल्यामुळे मंगळवारी रात्री नऊ वाजता तालुक्यातील पुर्व भागात वादळाने परिसरातील पंधरा गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.रात्रीच महावितरण कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठता दाखवून विज पुरवठा सुरळीत केल्यामुळे नागरीकांतून त्यांचे कौतुक होत आहे.
३३ के.व्ही.दहेगांव वाहीनीमध्ये जोरदार पाऊस तसेच वादळामुळे बिघाड झाला.या वाहीनीवर असलेले ०२ ३३/११ के.व्ही चे उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत झाला.त्यामुळे परिसरातील एकुण १५ गावे अंधारात गेली होती.तत्काळ सवंत्सर कक्षाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता भर पावसात विद्युत वाहीनीवरील बिघाड शोधून त्यावर उपाय योजून विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे.त्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव येथील १३२ के व्ही उपकेंद्र येथून निघणारे ३३ के.व्ही.दहेगांव वाहीनीमध्ये जोरदार पाऊस तसेच वादळामुळे बिघाड झाला.या वाहीनीवर असलेले ०२ ३३/११ के.व्ही चे उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत झाला.त्यामुळे परिसरातील एकुण १५ गावे अंधारात गेली होती.तत्काळ सवंत्सर कक्षाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे वरिष्ठ तंत्रज्ञ मयुर आष्टेकर,नितिन सोनवणे,राजेंद्र इंगळे,हरिभाऊ चौतमल,विनोद चोरघे तसेच दहेगाव कक्षातील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता भर पावसात विद्युत वाहीनीवरील बिघाड शोधून रात्री एक ते दिड वाजेदरम्यान खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत केला.त्यामुळे रात्रीच्या उकाड्यातून नागरीकांना दिलासा मिळाला.
महावितरण कर्मचारी आणि अधिकारी यांनी मध्यरात्रीच्या वेळी दाखविलेल्या कर्तव्य तत्परतेचे परिसरातील नागरीकांतून कौतूक होत आहे.कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भुषण आचार्य यांनी देखील कर्मचाऱ्यांचे तोंड भरुन कौतुक केले आहे.