जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ऊर्जा विभाग

…आता ४० पैशांमध्ये एक किलोमीटर प्रवासाचा प्रयोग !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

मुंबईः

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींनी नागरिक आणि कष्टकरी वर्ग पार मेटाकुटीला आला आहे. सरकारी पातळीवर कितीही कर कपात केली तरी किंमती पूर्व पातळीवर येत नाहीत,जादा दाम मोजावेच लागतात.पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे जनतेच्या रोषाची सरकारी पातळीवर दखल घेतली जात आहे.पेट्रोल डिझेलला पर्याय शोधण्याचे प्रयोग सुरू आहेत.इलेक्ट्रिक कार हा त्यातलाच एक नवा प्रयोग आहे.सीएनजी,एलपीजी हे पर्याय आहेतच; पण याऐवजी अगदी स्वस्तातल्या पर्यायांची चाचपणी सुरू आहे.त्यात अवघ्या ४० पैशांमध्ये एक किलोमीटर अंतर कापण्याच्या एका अफलातून प्रयोगाचीही चर्चा आहे.हायड्रोजन कार विषयी ही चर्चा रंगली आहे. केवळ आठ रुपयाच्या एक लिटर इंधनात हा प्रयोग यशस्वी करण्याच्या चाचण्या सुरू आहेत.

‘ग्रीन हायड्रोजन’ अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून तयार केला जाऊ शकतो.चर्चेची पहिली फेरी यशस्वी ठरल्याने आता अंतिम फेरीनंतर सरकारी पातळीवर या वाहनांसाठी कंपन्यांना कार उत्पादनाची ऑर्डर देण्यात येईल.तसंच सार्वजनिक वापरासाठी ही वाहनं बाजारात आणण्याची घाई करण्यात येणार आहे.इंधनाचा पुरवठा करण्याची व्यवस्था ही करण्यात येणार आहे.

केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रयोगासाठी कंबर कसली आहे.मागे ते थेट संसदेत हायड्रोजन कारने पोहचले तेव्हाच या चर्चांना उधाण आलं होतं.आता या चर्चांना मूर्त रूप येण्याची प्रतीक्षा आहे.गडकरी यांची हायड्रोजन कार उत्पादन कंपन्यांशी चर्चेची पहिली फेरी यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे देशात लवकरच हायड्रोजनवर चालणार्‍या चारचाकी दिसतील.यासाठीचं इंधन नागरिकांना अगदी स्वस्तात उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे.नागरिकांना केवळ आठ रुपये प्रति लिटर दराने इंधन मिळण्याची शक्यता आहे.‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ पेक्षा ही या कार शून्य कार्बन उत्सर्जन करत असल्याने तो सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हे वाहन संपूर्णतः पर्यावरण पूरक असल्याने सरकार या पर्यायावर भर देत आहे.या वाहनातून पाण्याशिवाय इतर कोणत्याही पदार्थाचं उत्सर्जन होणार नाही.

‘ग्रीन हायड्रोजन’ अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून तयार केला जाऊ शकतो.चर्चेची पहिली फेरी यशस्वी ठरल्याने आता अंतिम फेरीनंतर सरकारी पातळीवर या वाहनांसाठी कंपन्यांना कार उत्पादनाची ऑर्डर देण्यात येईल.तसंच सार्वजनिक वापरासाठी ही वाहनं बाजारात आणण्याची घाई करण्यात येणार आहे.इंधनाचा पुरवठा करण्याची व्यवस्था ही करण्यात येणार आहे.त्यासाठी जागोजागी पंप उभारण्याची सोय करण्यात येणार आहे.‘ग्रीन हायड्रोजन’ हा ऊर्जेचा स्वच्छ स्रोत मानण्यात येतो. ‘ग्रीन हायड्रोजन’ तयार करण्यासाठी पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जातात. या प्रक्रियेत ‘इलेक्ट्रोलायझर’चा वापर केला जातो. ‘इलेक्ट्रोलायझर’ अक्षय ऊर्जा वापरतं.यामध्ये सौर आणि पवन ऊर्जा यांचा वापर करण्यात येतो.हायड्रोजनच्या वापरामुळे प्रदूषणही होत नाही.

या कारमध्ये हायड्रोजन टँकसाठी विशेष जागा करावी लागते. त्यात दोन टँक असतात.एक ‘हायली कंप्रेस्ड’ आणि दुसरा ‘लो कम्प्रेस्ड’ असतो.हायड्रोजन वायू हा अत्यंत ज्वलनशील असल्याने पुरेशी काळजी आणि सुरक्षा मानकं पूर्ण करावी लागतात.यासाठीची साधनं अत्यंत सुरक्षीत आणि मजबूत असावी लागतात. कार सुरू करण्यासाठी आणि तिला गती देण्यासाठी लागणारी ऊर्जा ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या संयुक्त प्रक्रियेतून तयार करण्यात येते.दोघांमधल्या रासायनिक अभिक्रियामुळे एक ऊर्जा निर्माण होते.या कारमधून धुराऐवजी पाणी बाहेर पडतं. त्यामुळे प्रदूषणाला आळा बसतो.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close