जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
उद्योग जगत

एसीच्या किंमतीत १५ टक्के वाढ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
मुंबईः

वाढत्या उष्णतेच्या काळात, दमत हवामानाच्या काळात कूलिंग उत्पादनांची, विशेषत: एअर कंडिशनरची मागणी झपाट्याने वाढते. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशांतर्गत बाजारात एसीची विक्री विक्रमी ६० लाख युनिट्सवर पोहोचली. गेल्या सहा महिन्यांमध्ये एसीच्या किमती दोन ते तीन वेळा वाढल्या. एकुणात किंमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

“या वर्षातली पहिली सहामाही एसी उद्योगासाठी खूप चांगली गेली आहे. त्यांनी सांगितलं की जानेवारी ते जून दरम्यान देशांतर्गत एसी मार्केट सुमारे ६० लाख युनिट्सचं असेल”-अध्यक्ष,‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे (सीमा)

महागाईचा अभूतपूर्व दबाव आणि लॉजिस्टिक शुल्कात वाढ झाल्यामुळे कंपन्यांना किमती वाढवाव्या लागतात. सर्व मोठ्या कंपन्यांच्या विक्रीत तेजी आली आहे. व्होल्टासने सुमारे १.२ दशलक्ष एसी विकले.एलजी इलेक्ट्रॉनिक इंडियाने पहिल्या सहामाहीत देशांतर्गत बाजारात १० लाख इन्व्हर्टर एसी विकले. हिताची, डायकीन, पॅनासॉनिक आणि हायरसारख्या इतर एसी निर्मात्यांनीदेखील विक्रीमध्ये वाढ नोंदवली असून वर्षाच्या उत्तरार्धातही विक्री चांगली राहील अशी अपेक्षा आहे. ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे (सीमा) अध्यक्ष एरिक ब्रेगान्झा म्हणाले की, या वर्षातली पहिली सहामाही एसी उद्योगासाठी खूप चांगली गेली आहे. त्यांनी सांगितलं की जानेवारी ते जून दरम्यान देशांतर्गत एसी मार्केट सुमारे ६० लाख युनिट्सचं असेल.
ते पुढे म्हणाले की, याआधी कधीच विक्रीचे आकडे इतके जास्त नव्हते. दुसर्‍या सहामाहीत २.५ दशलक्ष युनिट्स विकले जातील आणि वर्षाच्या अखेरीस सुमारे ८५ लाख युनिट्स विकले गेलेअसतील, असा अंदाज आहे. २०१९ मध्ये बाजारावर महामारीचा परिणाम झाला नव्हता, तेव्हा पहिल्या सहामाहीमध्ये एसीचे ४२.५ ते ४५ लाख युनिट्स विकले गेले. कंपन्यांच्या विक्रीमध्ये १७५ टक्के वाढ झाल्याचं ‘डायकिन इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के.जे. जावा म्हणाले की, कंपनीने एप्रिल-जून तिमाहीत सुमारे चार लाख युनिट्स आणि २०२२ च्या पहिल्या सहामाहीत सुमारे सात लाख युनिट्सची विक्री केली. त्यामुळे विक्रीमध्ये २०१९ च्या तुलनेत सुमारे ३० टक्के वाढ तर गेल्या वर्षीच्या तुलनेत १७५ टक्के वाढ झाली आहे.
वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, व्होल्टासने सुमारे १२ लाख एसी युनिट्सची विक्री केली, जी उद्योगातल्या इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक इंडियाने पहिल्या सहामाहीत देशांतर्गत बाजारात दहा लाखांहून अधिक निवासी इन्व्हर्टर एसीची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी अधिक आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक इंडियाचे उपाध्यक्ष (गृह उपकरणं आणि एअर कंडिशनर्स) दीपक बन्सल म्हणाले की, जानेवारी ते जून या कालावधीत एसी श्रेणीने चार हजार कोटी रुपयांची कमाई केली. ‘पॅनॉसॉनिक इंडिया’च्या एसीची पहिल्या सहामाहीत विक्री २०१९ च्या तुलनेत ३५ टक्क्यांनी जास्त आहे. ‘हायर अप्लायन्सेस इंडिया’चे अध्यक्ष सतीश एन. एस. म्हणाले की मूल्याच्या बाबतीत, आम्ही वार्षिक आधारावर ७० टक्के वाढ केली आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close