आयुर्वेद
आयुर्वेद ही प्राचीन भारताची उपचार पद्धती-…यांची माहिती

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आयुर्वेद ही भारताची प्राचीन उपचार आणि जीवनशैली असून विश्वालाही भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व समजले असून तो प्राचीन भारताची उपचार पद्धती असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात केले आहे.

“मानवी शरीरातील कफ,पित्त,वात यामुळे होणारे विकार टाळण्यासाठी आयुर्वेद पथ्याची जीवनशैली शिकवते.उपवास करण्यामागे शास्त्रीय कारण आहे.मनुष्याने दिनचर्या,ऋतुचर्या आणि आहार संतुलन ठेवणे महत्त्वाचे आहे.आगामी काळाची गरज आयुर्वेद असणार आहे”-डॉ.रामदास आव्हाड,राष्ट्रीय आयुर्वेद गुरु.
. कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली शैक्षणिक, सामाजिक,कला,सांस्कृतिक क्षेत्रात कार्य सुरु असून यंदाचे सूर्यतेज संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेतले आहे.यात कोपरगांव येथील शाळांमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांचे “गिरवू आयुर्वेदाचे धडे” या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी आयुर्वेदाचार्य डॉ.रिद्धी आव्हाड, धर्मयोध्दा माजी खा.भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाणच्या मार्गदर्शिका नानीसाहेब बडदे,सूर्यतेज सल्लागार प्रा.लताताई भामरे, प्राचार्या अनिता धनक,स्वच्छतादूत सुशांत घोडके,प्रा.माया रक्ताटे,महेश थोरात,वर्षा जाधव,अनंत गोडसे,उपप्राचार्या उज्वला म्हस्के, पर्यवेक्षिका सुनिता पवार,प्रभाकर आभाळे, रयतच्या लाईफ वर्कर सुनिता वाबळे, सांस्कृतिक विभागाच्या माधवी हरिदास, कविता निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आयुर्वेदाचे संशोधन काळानुसार सिध्द होत आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने “प्रकृती परिक्षण अभियान” राबवून आयुर्वेदशास्राविषयी जनजागृती करत आहेत असे सांगत डॉ. आव्हाड पुढे म्हणाले,मानवी शरीरातील कफ,पित्त,वात यामुळे होणारे विकार टाळण्यासाठी आयुर्वेद पथ्याची जीवनशैली शिकवते.उपवास करण्यामागे शास्त्रीय कारण आहे.मनुष्याने दिनचर्या,ऋतुचर्या आणि आहार संतुलन ठेवणे महत्त्वाचे आहे.काळाची गरज आयुर्वेद असणार आहे.उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन सूर्यनमस्कार,ओमकार उच्चार नियमित करण्याचे आवाहन केले.साधा,सात्विक आहार उत्तम आरोग्य ठेवतो.सणासुदीला पदार्थ फक्त सणासुदीला खाण्याचे सांगितले.संस्कृत भाषा अवगत करुन आयुर्वेदाचे ज्ञान आणि पदवी संपादन करण्यासाठी आवाहन केले.
व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनीनी आयुर्वेदाशी निगडित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर डॉ.रामदास आव्हाड,आयुर्वेदाचार्य डॉ.रिध्दी आव्हाड यांनी दिली.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत स्वागतगीताने झाले. डॉ.रामदास आव्हाड यांनी कन्या आयुर्वेदाचार्य डॉ.रिध्दी आव्हाड वाढदिवसानिमित्त शाळेला सी.सी.टि.व्ही.करिता मदत केली.
उपस्थितांचे स्वागत प्राचार्य अनिता धनक, पाहुण्यांचा परिचय अरुण बोरणारे यांनी तर सुत्रसंचालन ज्योती गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मनोहर म्हैसमाळे, वेणुगोपाल अकलोड यांचे सह सह शिक्षक व सूर्यतेज सदस्यांनी परिश्रम घेतले आहे.