जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

ऐन निवडणुकीत गणेशचा प्रवरेशी करार,सभासदाचा केला विश्वासघात-आरोप

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

आज रोजी दि.३१ मे रोजी रोजी गणेश कारखाना परत एकदा प्रवरा कारखान्यास चालवण्यासाठी गणेशच्या मुदत संपलेल्या संचालक मंडळा कडून आक्रीत करार होत आहे.गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली असून ज्या संस्थेची निवडणूक प्रक्रिया चालू आहे अशा संस्थेच्या संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहे का असा ? सवाल गणेश कारखान्याच्या ०८ हजार २५० सभासदासह कामगाराकडून कडून केला जात आहे.याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने सवाल विचारला आहे.त्यामुळे या हुकूमशाही विरोधात सभासदांत मोठा संताप व्यक्त होत असून शेतकरी संघटनेने या विरोधात रणशिंग फुंकले आहे.

“गणेशच्या कामगारांचे थकीत पेमेंट कामगार नेते रमेश देशमुख यांच्या नेतृत्वात अड्.अजित काळे यांनी न्यायालय लढाई लढून अडीच कोटी रुपये कामगारांना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून मिळवून दिले होते.यापुढेही शेतकरी संघटनेना कायदेशीर मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ज्या सहकारी संस्था राजकीय नेत्यांनी राजकारणासाठी व स्वतःच्या सोयीसाठी वापरल्या तिथे तिथे शेतकरी संघटना पूर्ण ताकतीने संबंधित कामगार सभासद व हितचिंतक यांना बरोबर घेऊन विरोध करणार आहे”-अनिल औताडे,अध्यक्ष,जिल्हा शेतकरी संघटना.

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूकीस आता रंग भरू लागला १९ जागांसाठी हि निवडणूक संपन्न होत असून आलेल्या एकूण १०६ पैकी नामनर्देशन पत्रापैकी १३ अवैध झाले असताना दाखल असलेले अर्ज इच्छुकांना २३ मे ते ०६ जून या दरम्यान मागे घेण्याची अंतिम मुदत असताना या न निवडणुकीला एक गंभीर वळण प्राप्त झाले असून यात आगामी काळातील लोकशाहीच्या चाकोरीतील हुकूमशाही स्पष्ट दिसू लागली आहे.

दरम्यान या निवडणुकीत दि.३१ मे रोजी गणेश कारखाना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान दिलेल्या निकाला विरोधात शेतकरी संघटनेच्या उमेदवारांनी आक्षेप नोंदवून प्रादेशिक सहसंचालक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अ.नगर यांच्याकडे अपील केले आहे.सदर अपीलाची सुनावणी आज होणार असताना संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सुनावणी रद्द करून अचानक वेळकाढूपणा करून ती उद्या दि.०१ जून रोजी ठेवली आहे.सदर करारासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे गणेश व प्रवरा करारा संदर्भात बैठक आयोजित केली आहे.वास्तविक सदर करारा बाबत प्रवरा कारखाना इतका आग्रही का असा प्रश्न निर्माण होत आहे.मागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या करारा दरम्यान गणेश कारखान्याचा तोटा ३७ कोटी असताना प्रवरा कारखान्याने ताब्यात घेतल्यानंतर सदर कारखान्याचा तोटा १३७ या विक्रमी पातळीवर पोहचला असताना डॉ.विखे (प्रवरा) कारखाना स्वतः ९०० ते ९५० कोटी रुपये कर्जात असताना अर्थात तोट्यात असताना दुसऱ्या तोट्याच्या संस्थेची करार कसा व का करत आहे ? हा ही एक गंभीर सवाल निर्माण झाला आहे.वास्तविक गणेश कारखान्याकडे स्वतःच्या कार्यक्षेत्रात साडेतीन ते चार लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे.आगामी काळात निळवंडेचे पाणी या दुष्काळी सिंचन झाल्यास या भागात गाळपासाठी पुरेसा ऊस निर्माण होणार आहे.मात्र अलीकडील काळात सदर ऊस प्रवरा कारखाना वेळोवेळी गणेश कारखान्यात गाळप करण्याऐवजी प्रवरा कारखान्यामध्ये सदर उसाची गाळप होत आहे.सदर कारखान्याच्या कामगारांची नेमणूक इतरत्र केली जात आहे.हा करार करत असताना प्रवरा कारखान्याने गणेश कारखान्याच्या ०८ हजार २५० सभासदांना विश्वासात घेणे गरजेचे होते आणि ते लोकशाहीला पूरक व अभिप्रेत होते; परंतु तसे न करता प्रवरा कारखान्याचे संबंधित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे आपल्या पदाचा गैरवापर करून दबाव तंत्र निर्माण करून हा करार करत आहे.याबाबत सभासदांना व कामगारांना विश्वासात घेतले नाही.या होत असलेल्या करारांना अ.नगर जिल्हा शेतकरी संघटना,सभासद गणेश कारखाना,कामगार व ऊस उत्पादक तसेच राहता तालुक्यातील गणेश कारखाना समविचारी हितचिंतक यांच्या वतीने शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष उच्च न्यायालय वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वात गणेश कारखाना बचावासाठी पूर्ण शक्तीनिशी काम करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिली आहे.यासाठी समविचारी घटकांना बरोबर घेऊन राजकीय,सामाजिक तसेच न्यायालयीन लढाई अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

गणेशच्या कामगारांचे थकीत पेमेंट कामगार नेते रमेश देशमुख यांच्या नेतृत्वात अड्.अजित काळे यांनी न्यायालय लढाई लढून अडीच कोटी रुपये कामगारांना देण्याचे आदेश उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्याकडून मिळवून दिले होते.यापुढेही शेतकरी संघटनेचे अड्.काळे यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ज्या ज्या सहकारी संस्था राजकीय नेत्यांनी राजकारणासाठी व स्वतःच्या सोयीसाठी वापरल्या तिथे तिथे शेतकरी संघटना पूर्ण ताकतीने संबंधित कामगार सभासद व हितचिंतक यांना बरोबर घेऊन विरोध करणार आहे.हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी उभारलेला लढा असून या लढ्याला शेतकऱ्यांनी साथ द्यावी असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.
आज रोजी १३७ कोटीच्या आसपास तोट्यात असलेला गणेश कारखाना,प्रवरा कारखाना चालवण्यास घेण्यासाठी का आग्रही आहे.यातच सर्व काही आले आहे.

दरम्यान दरम्यान गणेश कारखाना निवडणूक व गणेश व प्रवरेचा होत असलेला करार याबाबद शनिवार दि.०३ जून गणेश कारखाना गेट समोर जाहीर मेळावा घेण्यात येणार आहे.ऍड.अजित काळे हे सभासद व कामगारांना करारा बाबद कायदेशीर तसेच निवडणूकी बाबद राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे करणार आहे.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे विचार ऐकण्यासाठी उपस्तित राहण्याचे आव्हाहन अ.नगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने अनिल औताडे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close