जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या ठिकाणी शेतकरी संघटनेचा उद्या शेतकरी,कामगार मेळावा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्याची कामधेनू ओळखल्या जाणाऱ्या गणेश सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी व उत्पादक शेतकऱ्यांचे अंतिम देयक व कामगारांचे थकीत वेतन मिळून देण्यासाठी कार्यरत असलेले शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दि.०६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता राहाता येथील नवनाथ मंदिरात,’शेतकरी व कामगारां’चा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती कामगार नेते रमेश देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.व या साठी राहाता,श्रीरामपूर,कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

“अड्.अजित काळे यांनी निळवंडे कालव्यांचे गत ५३ वर्षांपासून प्रलंबित काम निळवंडे कालवा कृती समितीचे विक्रांत काले पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या याचिकेद्वारे मार्गी लावले आहे.याशिवाय गणेश सहकारी साखर कामगारांची भविष्य निर्वाह निधी १० टक्के व्याजासह मिळवून देण्यासह मुळा-प्रवरा सहकारी वीज वीज वितरण कंपनीवर कारवाई करुन उच्च न्यायालयाकडून प्रशासक आणले आहे.डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी नवीन प्रशासक नियुक्त केले आहे.आता गणेश सहकारी कारखान्याची साडेसाती हटविणे गरजेचे बनले आहे”-रमेश देशमुख,कामगार नेते,राहाता तालुका.

राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना वर्तमान स्थितीत राजकीय अडचणीत सापडून मोठ्या आर्थिक अरिष्ठांचा सामना करत आहे.सदर कारखाना वाचविण्यासाठी व कर्जातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाने प्रवरेच्या नेत्यांना मोठ्या अपेक्षेने चालविण्यास दिला होता.मात्र झाले उलट सदर तोटा भरून काढण्याचे प्रयत्न तर दूरच पण कामगारांच्या अंतिम देयकातून ३५ टक्के कपात करूनही सदर तोटा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.तर कामगारांची नियमित देणी देण्याचे काम दूरच राहिले त्यांच्या आयुष्याची पुंजी देण्यास विद्यमान संचालक मंडळाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.त्यासाठी त्यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे अड्.अजीत काळे यांच्या मार्फ़त ठोठावे लागले आहे.तरीही सत्ताधारी वर्गाकडून कुठ्ल्या न कुठल्या पळवाटा काढून त्यांचे रक्त शोषण सुरु आहे.

कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर सहकारी कारखान्याच्या तुलनेत खूप कमी ऊस दर मिळत आहे.त्यामुळे प्रतिटन ३००-४०० रुपयांचे ऊस उत्पादक आणि शेतकरी यांचे आर्थिक शोषण होत आहे.त्यामुळे राहाता तालुक्यात शेतकरी आणि कामगार यांच्यात मोठी नाराजी पसरली आहे.या गोष्टींना आळा घालण्याची व शेतकरी संघटित करण्याची वेळ आलेली आहे.त्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे हे मार्ग काढू शकतात अशी शेतकरी आणि कामगार यांची धारणा झाली आहे.त्यामुळे राहाता आणि कोपरगाव,श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांना निमंत्रित केले असल्याची माहिती कामगार नेते रमेश देशमुख यांनी दिली आहे.

याबाबत रमेश देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की,”अड्.अजित काळे यांनी निळवंडे कालव्यांचे गत ५३ वर्षांपासून प्रलंबित काम निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते विक्रांत रुपेंद्र काले पत्रकार नानासाहेब जयराम जवरे यांच्या याचिकेद्वारे (१३३/२०१६) मार्गी लावत आणले आहे.याशिवाय गणेश सहकारी साखर कामगारांची भविष्य निर्वाह निधी १० टक्के व्याजासह मिळवून दिला आहे.मुळा-प्रवरा सहकारी वीज वीज वितरण कंपनीवर कारवाई करुन उच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशासक आणले आहे.त्याठिकाणी सत्ताधाऱ्यांनी बेकायदा कमी केलेले सभासद त्यांना न्याय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी नवीन प्रशासक नियुक्त केले आहे.त्यामुळे आता आगामी काळात गणेश सहकारी कारखान्याची साडेसाती हटविण्यासाठी व शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी अड्.काळे यांना मदत करणे गरजेचे बनले आहे.

त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.राहाता,श्रीरामपूर,कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आणि त्यांच्या हितसंबंधी कारकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कामगार नेते रमेश देशमुख,सुभाष सांबारे,नारायण भुजबळ,भाऊसाहेब शिंदे,गीताराम शेलार,बाबासाहेब पगार,भाऊसाहेब कर्पे,किसन कोते,अण्णासाहेब सातव,भापुसाहेब सातव,बापूसाहेब धनवटे,दिलीप रक्ताटे,मधुकर बागडे आदींनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close