जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावातील…ते आंदोलन अखेर यशस्वी,प्रशासन ठिकाणावर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

केंद्र आणि राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर गत २४ फेब्रुवारी रोजी ‘छत्रपती संभाजीनगर’ असे करण्यात आले होते तरी राज्य परिवहन मंडळ मात्र भूतकाळात रममाण होऊन त्यांच्या तिकिटावर मात्र अद्याप औरंगाबादच असल्याने कोपरगाव शहर मनसेने या बाबत कोपरगाव बस आगाराचे कान उपटले होते त्यांची दखल राज्य परिवहन मंडळाने घेतली होती व आपली चूक दुरुस्त केली असून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या तिकिटावर आता,’छत्रपती सभांनीनगर’ असा उल्लेख केला असल्याने कोपरगाव शहर मनसेने समाधान व्यक्त केले आहे.

दि.२४ फेब्रुवारी २०२३ रोजी नरेंद्र मोदी सरकारने औरंगाबाद शहराच नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” देण्यास मंजुरी दिली होती.याला बरेच दिवस उलटले होते.यावर शासकीय स्तरावर अंमलबजावणी सुरु झाली होती.मात्र राज्य परिवहन मंडळाच्या कागदोपत्री मात्र हा शासन निर्णय पोहचलेला दिसत नव्हता.हि बाब,’कोपरगाव शहर मनसे’ने दि.२९ मार्च २०२३ रोजी राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगाराला निवेदन देऊन उघड केली होती व आंदोलनाचा इशारा दिला होता.तो आता फळाला आला आहे.

औरंगाबाद या शहराला औरंगाबाद हे नाव ‘औरंगजेब’ या अत्याचारी मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले होते.त्यापूर्वी या शहराचे जुने नाव खडकी होते.औरंगाबाद शहराचे नाव बदलून “संभाजीनगर” करण्याचा निर्णय सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात २९ जून २०२२ रोजी आणि तदनंतर १७ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नाव मंजूर झाले होते.

दरम्यान पुढे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी नरेंद्र मोदी सरकारने औरंगाबाद शहराच नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” देण्यास मंजुरी दिली होती.याला बरेच दिवस उलटले होते.यावर शासकीय स्तरावर अंमलबजावणी सुरु झाली आहे.मात्र राज्य परिवहन मंडळाच्या कागदोपत्री मात्र हा शासन निर्णय पोहचलेला दिसत नव्हता.हि बाब,’कोपरगाव शहर मनसे’ने दि.२९ मार्च २०२३ रोजी राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगाराला निवेदन देऊन उघड केली होती.व सदर बस तिकिटावर शहराचे नाव औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे बदलण्याची मागणी ‘मनसे’ चे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल व तालुका गोदावरी कालवा समितीचे कार्यकर्ते तुषार विध्वंस यांनी राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगारात प्रवेश करून बस मध्ये चढून तिकीट फाडून उघड केली होती.व याची दखल न घेतल्यास आंदोलनाची धमकी दिली होती.त्यामुळे सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला होता.याची गंभीर दाखल राज्य परिवहन मंडळाने घेतली होती व त्यावर कार्यवाही केली होती.त्याचे पडसाद नुकतेच उमटले असून परिवहन मंडळाने आपल्या प्रवासी तिकिटावर सदर चूक दुरुस्त केली आहे.त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.व कोपरगाव बस आगारात जाऊन आगार प्रमुखांचा सत्कार केला आहे.

सदर प्रसंगी मनसेचे कार्यकर्ते सुनील फंड,मुन्नाभाई पाटणी,अनिल गायकवाड,तुषार विध्वंस संतोष गंगवाल,योगेश गंगवाल आदी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close