जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

राहुरीतील…’त्या’ घटनेचा कोपरगाव शहरात निषेध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यात ‘डी पॉल’ या इंग्रजी माध्यम शाळेतील फादरने ०९ वी शिकत असलेल्या शिख समाजातील मुलांचे केस कापुन पगडी उतरवून धर्मातरण केल्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कोपरगाव शहरात तहसिल कार्यालावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

“राज्यात धर्मांतराच्या घटना घडत असताना राजकीय नेते केवळ आपल्या मतांच्या पेट्यांवर लक्ष ठेवून सदर गुन्हेगारांना अभय देत असून या घटना धक्कादायक आहे.यावर सरकारने कठोर कारवाई करावी अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील”-माजी नगराध्यक्ष,विजय वहाडणे,कोपरगाव नगरपरिषद.

सदर प्रसंगी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे या फादरवर कठोर कारवाई करण्यात यावी.शहरातील माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,कलविंदरसिंग दडियाल सह शिख समाजातील नागरिक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर घटनेचा निषेध केला आहे. सदरच्या घटनेचा कलविंदर दडियाल,आदींनी निषेध व्यक्त करुन कठोर कारवाई करावी अशा मागणी केली आहे.सदर प्रसंगी अनेकांनी कठोर शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी सेवासिंग राहणी,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,उद्धव शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,महिसींग पोथिवाल,बलविंदसिंग सेंबी,चंद्रमोहन पापडेजा,जगतारसिंग शेखो,चिनु भाटीया,करणसिंग ठकराल,मनसेचे संतोष गंगवाल,अनिल गायकवाड,भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष अविनाश पाठक,अमित जैन,गुलशन होडे,आदिसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close