जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोरोना कालखंडातील ‘वाहन चालक मानधन’ रखडले,तक्रार दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यासह देशभरात कोरोना साथ अडीच वर्ष ठाण मांडून होती या अडचणीच्या काळात विविध विभागाचे अतिरिक्त वाहन वापरण्यात येऊन त्यावर तात्पुरते वाहन चालक नेमून त्यांना मानधनाचे गाजर दाखवून काम करून घेतले मात्र सदर चालकांना अद्याप ‘वाहन चालक मानधन’ दिले नाही हा आपल्यावर अन्याय असून सदर मानधन सरकारने त्वरित दयावे अशी मागणी सुनील शिवाजीराव गायकवाड व अंकुश चांगदेव आहेर आदींनी तहसीलदार विजय बोरुडे यांचेकडे केली आहे.

“कोरोना काळात नियमित सरकारी वाहन चालक आजारी असल्याने व ते कर्तव्यावर नसल्याने सरकारने खाजगी वाहन चालक यांना मानधनावर नेमले होते.त्यांना अद्याप मानधन दिले नाही हि मोठी शोकांतिका आहे.यातील पहिले चालक सुनील गायकवाड यांनी वन विभागाचे वाहन क्रं.एम.एच.१५ एफ.वाय.२५६३ यावर दि.२४ मार्च २०२० ते १५ एप्रिल २०२० या कालावधीत तर दुसरे चालक अंकुश आहेर यांनी दि.१६ एप्रिल पासून पुढे चालक म्हणून काम केले होते,मात्र द्याप त्यांना मानधन मिळाले नाही हे विशेष !

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”सन २०२० साली कोरोनाची मोठी साथ देशात आली होती.त्यावेळी हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती.आरोग्य विभागाची वहाने कमी पडली होती.त्यावेळी अन्य शासकीय वहाने सरकारने ताब्यात घेऊन अधिग्रहण केली होती.व ती वहाने गस्तीसाठी वापरली होती.त्यासाठी नियमित सरकारी वाहन चालक आजारी असल्याने व ते कर्तव्यावर नसल्याने सरकारने खाजगी वाहन चालक यांना मानधनावर नेमले होते.त्यांना अद्याप मानधन दिले नाही हि मोठी शोकांतिका आहे.यातील पहिले चालक सुनील गायकवाड यांनी वन विभागाचे वाहन क्रं.एम.एच.१५ एफ.वाय.२५६३ यावर दि.२४ मार्च २०२० ते १५ एप्रिल २०२० या कालावधीत तर दुसरे चालक अंकुश आहेर यांनी दि.१६ एप्रिल पासून पुढे चालक म्हणून काम केले होते.

त्यामुळे सदरचे मानधन तहसीलदार यांनी देणे गरजेचे होते.मात्र अडीच वर्षानंतर गायकवाड व आहेर आदींना ते अद्याप अप्राप्त आहे.तरी कोपरगाव तहसीलदार यांनी त्वरित द्यावे अशी मागणीही त्यांनी शेवटी केली आहे.दरम्यान याबाबत कोपरगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार विजय बोरुडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close