जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावातील अतिरिक्त भार वाहतूक बंद करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव रेल्वे मालधक्का येथे साईचैतन्य लाॅजस्टिक यांच्या मार्फत साखर,साईराजा रोडवेज,यांच्या मार्फत खत,गहू,सिमेंन्ट आदी मालाची ने आण सुरु असून सदर वाहतूक करताना भार क्षमतेपेक्षा जास्त माल भरून शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे.उच्च न्यायालय मुंबईचे खंडपीठ नागपूर यांचे राज्य परिवहन विभागाला भार क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करताना दोषी आढळणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईचे आदेश असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कोपरगाव शहरातील स्थानिक मालवाहतूकदारांनी त्याचा विरोध सुरु केला असून हि अवैध वाहतूक त्वरित बंद करावी अशी मागणी कोपरगाव तालुका ट्रक मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष आयुब कच्छी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“राज्य परिवहन आयुक्त यांनी राज्यात परिवहन अधिकारी कार्यालयाला अतिरिक्त भार वाहतूकदारांवर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे लिखित आदेश आहेत.श्रीरामपूर परिवहन अधिकारी कार्यलयाला कोपरगाव चालक मालक तर्फे दि.०३ फेब्रुवारी २०२२ रोजी संबधित हुंडेकरी यांच्या विरुद्ध तक्रार निवेदन दिलेली असताना त्यांनी अद्याप काही दखल घेतलेली नाही.यामुळे संघटना नाराज असून याबाबत कारवाहीचे मागणी करत आहे”-आयुब कच्छी,अध्यक्ष,कोपरगाव तालुका ट्रक मालक-चालक संघटना.

वाहन क्षमते पेक्षा वाहतूक केल्या प्रकरणी प्रिव्हेशन ऑफ डॅमेज टू पब्लिक पॉपर्टी अॅक्ट-१९८४ तरतूदीनुसार त्यास जबाबदार वाहतूकदार व घटकाविरुद्ध स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे आदेश आहेत.मात्र वाहतूक विभाग आपल्या सोयीसाठी त्याकडे सोयीस्कर कानाडोळा करत आहे.त्यामुळे रस्ते व रस्त्यावरील नागरिक आदींना धोका निर्माण झाला आहे.

याबाबत राज्य परिवहन आयुक्त यांनी राज्यात परिवहन अधिकारी कार्यालयाला संबधितावर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे लिखित आदेश आहेत.श्रीरामपूर परिवहन अधिकारी कार्यलयाला कोपरगाव चालक मालक तर्फे दि.०३ फेब्रुवारी २०२२ रोजी संबधित हुंडेकरी यांच्या विरुद्ध तक्रार निवेदन दिलेली असताना त्यांनी अद्याप काही दखल घेतलेली नाही.याबाबत स्थानिक लोकप्रतिनीधीनी समजावयाचा प्रयत्न केला परंतू मुजोर ठेकेदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. विशेष म्हणजे तिथे वाहतूक करण्याऱ्या गाड्यांचे कागदपत्र अपूर्ण आहेत सदर रस्त्यावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी,साखर कारखाना,ऊस वाहतूक बैलगाडी,शिर्डीला येणारे भाविक यांच्या जिवितास धोका उत्पन्न झाला आहे.

सदर अवैध वाहतूकीस आळा न घातल्यास उच्च न्यायालय यांच्या आदेशाचे अवमान प्रकरणी स्थानिक पदाधिकारी वरिष्ठाकडे तक्रार दाखल करून कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका ट्रक मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष आयुब कच्छी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close