जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

आ.मिटकरींच्या…त्या विधानाचा कोपरगावातही आज ब्राम्हण सभेच्या वतीने निषेध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आ.मिटकरी यांनी सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ब्राम्हण समाजातील पुरोहितांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून कोपरगावातही आज ब्राम्हण सभेच्या वतीने तहसीलदार विजय बोरूडे यांना निवेदन देऊन त्यांचा निषेध केला आहे.

राष्ट्रवादीचे आ.मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इस्लामपूर येथील संवाद सभेत भाष्य करताना पुरोहित वर्गाची आणि ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येत असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी राज्यभरासह कोपरगाव शहरातूनही आज झाली आहे.

राष्ट्रवादीचे आ.मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इस्लामपूर येथील संवाद सभेत भाष्य करताना पुरोहित वर्गाची आणि ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येत असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे.कोपरगाव शहरातील ब्राम्हण समाजही त्याला अपवाद नाही.येथील ब्राम्हण सभेच्या वतीने आज तहसीलदार विजय बोरुडे,कोपरंगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदींना निवेदन देण्यात आले आहे.

सदर प्रसंगी ब्राम्हण संघाचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर,सचिव देविदास महाजन,अड.श्रद्धा जवाद,संदीप कुलकर्णी,जयेश बडवे,योगेश कुलकर्णी,महेंद्र कुलकर्णी,संजीव देशपांडे,गोविंद जवाद,सदाशिव धारणगावकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

आ.मिटकरी यांच्याकडून वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य केले जात आहे.त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.यावेळी ब्राम्हण समाज बांधव आक्रमक झाल्याचे दिसून आले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close