जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

मुंबईतील…ते कृत्य निंदनीय,कोपरगावात…या नेत्याचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर एस.टी.कर्मचाऱ्यांनी केलेली दगडफेक हे निंदनीय कृत्य असून या घटनेचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“खा.शरद पवार यांच्या सारखा पुरोगामी नेता होणे नाही.त्यांनी राज्यासह देशाला दिशा दिली आहे.त्यांचा देशभर आदरयुक्त धाक आहे.त्यांच्या घरावर हल्ला होणे हे अत्यंत निंदनीय घटना आहे असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही”-संदीप वर्पे.कार्याध्यक्ष,नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस.

मुंबईत काल आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते.यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला होता.खा.शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली आहे.दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे.त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.याघटनेचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यात आज सर्वत्र निषेध व्यक्त केला आहे.कोपरगाव शहरातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे.कोपरगाव शहर राष्ट्रवादीच्या वतीने आज सकाळी १० वाजेच्या सुमारास महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,सेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल,शहराध्यक्ष सुनील गंगूले,रोहिदास होन,उपाध्यक्ष अशोक आव्हाटे,डॉ.तुषार गलांडे,धरमचंद बागरेचा,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,रमेश गवळी,मनोज नरोडे आदी मान्यवरांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

त्यावेळी त्यांनी पुढे म्हटले आहे की,”घटनेने आपल्याला हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला असून आपल्या मागण्या मांडण्यासाठी विविध व्यासपीठ निर्माण करून दिलेली आहेत.त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून या देशाच्या प्रत्येक नागरीकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार असला तरी अशा प्रकारचा हल्ला करणे हे लोकशाहीला मारक असून लोकशाहीसाठी अशोभनीय असून हे कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही.
खा.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकार समर्थपणे राज्याला प्रगतीच्या दिशेने घेवून जात आहे.देशाचे पंतप्रधान देखील अडचणींच्या वेळी त्यांचा सल्ला घेतात. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पाच दशक या देशाच्या व राज्याच्या हितासाठी खर्ची घातले आहे. सर्वपक्षीय नेते त्यांचा आदर करतात.अशा संयमी ज्येष्ठ नेत्याच्या घरावर करण्यात आलेला हल्ला निंदनीय आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने अशा भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे आ.काळे यांनी म्हटले आहे.

सदर प्रसंगी संदीप वर्पे यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करून ते म्हणाले की,”खा.शरद पवार यांच्या सारखा पुरोगामी नेता होणे नाही.त्यांनी राज्यासह देशाला दिशा दिली आहे.त्यांचा देशभर आदरयुक्त धाक आहे.त्यांच्या घरावर हल्ला होणे हे अत्यंत निंदनीय घटना आहे.त्यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचाही सामाजिक संकेतस्थळावर केलेल्या टिपणीचा व चारोळ्यांचा समाचार घेतला आहे.

सदर प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांना आपल्या आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होंता.

सदर प्रसंगी प्रास्तविक सुनील गंगूले यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन विरेन बोरावके,मंदार पहाडे,रमेश गवळी,मेहमूद सय्यद यांनी केले व या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.सदर प्रसंगी राजेंद्र वाघचौरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close