जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगाव बस आगाराचे चार दिवसात..इतक्या लाखांचे नुकसान,आंदोलन सुरूच

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीची चाके बंद पडली आहे.एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एस.टी.कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.त्याला गत चार दिवसापासून कोपरगाव शहरातील सर्व एसटी कामगारांनीं मंडप टाकून पाठिंबा दिला आहे.मात्र अद्याप या आंदोलनावर तोडगा न निघाल्याने आर्थिक दुर्बल घटकातील बस प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.कोपरगावातील या आंदोलनात मात्र इंटक,स्टेट कामगार संघटना,शिवसेना कामगार आदी कामगार संघटनांनी आपले अंग झटकून टाकले आहे.चार दिवसात कोपरगाव बस आगाराचे जवळपास ३४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती हाती आली आहे.

“कोपरगावातील बस दररोज २१ हजार किमीचे प्रवास करतात व त्यातून प्रतिदिनी ०८.५० लाख रुपयांचे उत्पन्न आगारास मिळत असून ते चार दिवसापासून बंद झाले आहे.व जवळपास ३४ लक्ष रुपयांचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.वर्तमानात ४२८ पैकी केवळ ११ कामगार कामावर हजर आहे.यात कोणीही संघटना सामील नाही”-अभिजित चौधरी,एस.टी.आगार प्रमुख कोपरगाव.

राज्य परिवहन मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्यावं अशी प्रमुख मागणी करत राज्यातील बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.काल मंत्रालयावर मोर्चासाठी निघालेल्या भाजप नेत्यांसह काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर आझाद मैदानात आणलं होतं.जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर कर्मचारी मुंबई सोडणार नसल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे कामावर रूजू न होणाऱ्यांविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.संपकरी कर्मचाऱ्यां विरोधात महामंडळ आक्रमक झालं आहे.मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलंय.तर दुसरीकडे कारवाई सुरू ठेवलीये परवा ३७६ आणि काल ५४२ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.एकूण 918 कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत महामंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे.कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या कारवाईचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत.कामावर हजर राहावे असे आवाहन संघटनांनी करावे असे आवाहन मुख्यमंत्री यांनी हात जोडून केले आहे तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्याला दुजोरा दिला आहे.तर महामंडळाच्या विलीनीकरण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरचे आंदोलन सुरू ठेवण्याचं भाजपनं म्हटलं आहे.त्यामुळे हे आंदोलन कोणत्या स्थरावर जाईल याचा काहीच अंदाज नाही.या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस आगरही बंद असून प्रवाशांचे हाल होत आहेत.तर खाजगी प्रवासी वाहने या प्रवाशांची लूट करत आहेत.त्यामुळे प्रवासी चिंतेत आहे.आता लवकरच शाळा सुरु होणार आहे.त्यामुळे अधिकच्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

दरम्यान याबाबत शिवसेनेच्या कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,”हा लढा कामगारांचा स्वतंत्र असल्याचा उल्लेख करून कोणत्याही संघटनेचा यांचेशी संबंध नसल्याचा उल्लेख केला आहे.

दरम्यान याबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे तालुका सचिव संजीव गाडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”हे आंदोलन कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटनेने पुकारलेले आहे.त्याच्याशी अन्य संघटनांचा संबंध नाही मात्र त्याला वैयक्तिक कामगारांनी पाठिंबा दिला आहे” असे म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close