आंदोलन
समृद्धी महामार्गाच्या कामाने रस्त्याची लागली वाट,ग्रामस्थांचा “रास्ता रोको”
न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
राज्याचा महात्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु असले तरी या महामार्गाने संलग्न व नजीकच्या रस्त्यांची वाट लागली आहे.त्यामुळे नजीकच्या गावात मोठा असंतोष पसरला असून यातूनच कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील ग्रामस्थांनी काल सकाळी संवत्सर शिवारात “रास्ता रोको” आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला आहे.व लेखी आश्वासन दिल्यावर आपले आंदोलन मागे घेतले आहे.
याच मार्गावरून समृद्धीची अवजड वाहने व कान्हेगाव येथील सोमय्या ओर्गोनो केमिकल व तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याच्या अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असते.त्यामुळे या तीन प्रमुख कारणाने या रस्त्यांची वाट लागली आहे.या अवजड वाहनांची बऱ्याच वेळेला वाहतूक करताना मोठमोठे दगड रस्त्यात पडत असून त्यामुळे अन्य वाहनांना रस्त्यातून मार्ग काढणे मोठे जोखमीचे ठरत आहे.त्यामुळे हे आंदोलन झाले आहे.
महाराष्ट्र ही भारताची बळकट राज्य अर्थव्यवस्था म्हणून कायम राहिली आहे,व्यापार चळवळीतील संधींच्या वाढीसाठी महाराष्ट्राने देशाच्या विकासास नेहमीच हातभार लावला आहे.राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक-व्यावसायिक दाव्याला बळकटी देण्यासाठी या मोहिमेमध्ये,भाजप राजवटीत महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबई-नागपूर या महामार्गाचे काम सुरु केले आहे.राज्यात आघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी या महामार्गाचे नाव ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे केले आहे.या मार्गाची लांबी ७१० कि.मी.आहे.सरकारने नागपूर-मुंबई शीघ्र संचार ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.त्याचे काम नागपूरच्या बाजूने आटोपले असले तरी नगर जिल्ह्यात मात्र त्याला मंद गतीने ग्रासले आहे.नगर जिल्ह्यात गायत्री या कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे.मात्र त्यांनी या कामाला योग्य न्याय दिलेला नाही.नागपूर ते शिर्डी हे काम जवळपास पूर्ण झाले आहे .मात्र कोपरगाव पासून घोटी पर्यंत या कामाला अद्याप न्याय दिला गेलेला नाही.त्यामुळे सरकारचे व या महामार्गालगतच्या गावांच्या संलग्न रस्त्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
या ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्ग- कान्हेगाव ते संवत्सर गावातील शुंगेश्वर चौक या दरम्यान या कामाच्या अवजड वाहनांची मोठी अवजड वाहतूक सुरु असते.त्यामुळे या परिसरातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे.त्यामुळे अनेक अपघात घडत आहे.अशीच घटना कोपरगाव बाजार समितीचे संचालक भरत बोरणारे यांच्या बाबत घडली असून या मार्गावर पावसाने अधिकचे नुकसान केले आहे.त्यामुळे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला जागा न दिल्याने अपघात झाला मात्र त्यात ते सुदैवाने बचावले आहे.अशाच अनेक घटना घडल्या असून अनेकांना या मार्गावर आपला जीव मुठीत ठेऊन प्रवास करावा लागत आहे.याच मार्गावरून समृद्धीची अवजड वाहने व कान्हेगाव येथील सोमय्या ओर्गोनो केमिकल व तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याच्या अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असते.त्यामुळे या तीन प्रमुख कारणाने या रस्त्यांची वाट लागली आहे.या अवजड वाहनांची बऱ्याच वेळेला वाहतूक करताना मोठमोठे दगड रस्त्यात पडत असून त्यामुळे अन्य वाहनांना रस्त्यातून मार्ग काढणे मोठे जोखमीचे ठरत आहे.गत ३० जानेवारी रोजी याच कारणाने संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजने यांनी आंदोलन केले होते.नऊ महिन्यात हे दुसरे आंदोलन ठरले आहे.याच मार्गावरून सहकारी कारखान्यांची अवजड वाहतूक रात्रंदिन सुरु असते मात्र त्याकडे प्रस्थापित नेते परजणे गटाचे वावडे म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सदर प्रसंगी गायत्री कंपनीच्या वतीने प्रतिनिधी एस.एस.घोडेराव,तर सोमय्या समूहाकडून श्री पालवे यांनी सहभाग नोंदवला आहे.व सोमय्या समुहाने या रस्त्याची पन्नास टक्के जबाबदारी स्वीकारली आहे.व तसे दोन्ही कंपन्यांनी लेखी दिले आहे.त्यावेळी आंदोलन संपुष्टात आले आहे.त्यावेळी दोन्ही बाजूंनी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आले आहे.
सदर आंदोलनात उपसरपंच विवेक परजणे,बाजार समितीचे संचालक भरत बोरणारे,चंदकांत लोखंडे,लक्ष्मण साबळे,बाबुराव मैन्द, काका गायकवाड,सतीश शेटे,राजेश भामरे,ज्ञानदेव कासार,दिनकर वरगुडे,निवृत्ती लोखंडे,व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.