जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

….या समाजाचा मुंबईत,’महाएल्गार मोर्चा!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

     राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा १ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील आझाद हिंद मैदानावर सकाळी ११ वाजता मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चास बहुसंख्य समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे यांनी नुकतेच केले आहे.

“सदर मोर्चात संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे थकित कर्ज माफ करावे,संत रविदास महाराज यांचे नांवे विद्यापीठ सुरू करावे,त्यांच्या जयंती निमित्र सार्वत्रिक सुट्टी जाहीर करावी,संत रोहिदास मंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नियुक्त करण्यात यावे,सदर महामंडळात ठेकेदार पद्धती रद्द करून त्याठिकाणी चर्मकार तरुणांना संधी द्यावी आदीसह अनेक महत्वपूर्ण मागण्या केल्या जाणार आहेत”- दिलीप कानडे,अध्यक्ष,उत्तर महाराष्ट्र,चर्मकार महासंघ.

  राष्ट्रीय चर्मकार महासंघ द्वारा समाजाच्या न्याय हक्क व समाजातील घटकांच्या विकसित मागण्यासाठी या भव्य मोर्चाचे आयोजन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या युवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे व युवा प्रदेश अध्यक्ष अमर तांडेकर यांनी महाराष्ट्रात चर्मकार जनसंवाद तसेच समाज जनजागृती दौरा पार पाडला आहे.

   राष्ट्रीय चर्मकार महासंघ हे पूर्णतः अ-राजकीय सामाजिक संघटन आहे.विशेष करून समस्त चर्मकार समाजाला संघटित करून सर्व चर्मकार पोटजाती एका संघटनेच्या छत्राखाली आणून तसेच विविध छोट्या-मोठ्या संघटना विसर्जित करून माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २४ सप्टेंबर १९९५ रोजी महाराष्ट्र चर्मकार महासंघाची स्थापना झाली अर्थात पुढे त्याचे रूपांतर राष्ट्रीय पातळीवर पोहोचून राष्ट्रीय चर्मकार महासंघ या नवनिर्माण संघटनेत रुपांतर झाले आहे.राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष असलेले माजी समाज कल्याण मंत्री घोलप यांच्या नावावर त्यावेळी शिक्कमोर्तब करण्यात आला त्यांच्याच अध्यक्षतेखाली  मुंबईतील शिवतीर्थावर चर्मकार समाजाचे मेळाव्याचे आयोजन करून दोन ते तीन लाखांची समाजबांधवांची उपस्थिती उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे.चर्मकार समाजातील एकी आता पुन्हा एकदा मुंबईतील आझाद हिंद मैदानावर चर्मकार समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्यास संपूर्ण चर्मकार समाज एकत्रित होणार आहे याकडे मंत्रालयापासून तर जनसामान्य पर्यंत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

   सदर मोर्चात संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे थकित कर्ज माफ करावे,संत रविदास महाराज यांचे नांवे विद्यापीठ सुरू करावे,त्यांच्या जयंती निमित्र सार्वत्रिक सुट्टी जाहीर करावी,संत रोहिदास मंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नियुक्त करण्यात यावे,सदर महामंडळात ठेकेदार पद्धती रद्द करून त्याठिकाणी चर्मकार तरुणांना संधी द्यावी,मुंबई या ठिकाणी सदर महामंडळास जागा व जिल्हा स्तरावर कार्यालय द्यावे,कर्ज प्रकरणाच्या जाचक अटी रद्द कराव्या,त्यांचे प्रलांबित कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढावे,राज्यातील गटई कामगारांना पीच परवाने व स्टॉल,अस्वच्छ व्यवसायाची शिष्यवृत्ती त्वरित द्यावी,दोन लाखापर्यंत  कर्ज प्रकरणे मंजुरीचे अधिकार जिल्हास्तरावर द्यावे,जमीनदारांच्या जाचक अटी रद्द कराव्या,राज्य चर्मकार संघास मुंबईत प्रशस्त जागा द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदरच्या मोर्चास संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार बंधू व भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close