जाहिरात-9423439946
आंदोलन

अस्तरीकरणासह चाऱ्यांचे नकाशे त्वरित पूर्ण करा अन्यथा आंदोलन-..या समितीचा इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   उत्तर नगर  व नाशिक जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त समजल्या जाणाऱ्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरण आणि लाभक्षेत्रातील प्रस्तावित चाऱ्यांच्या कामाचे नकाशे जलसंपदा विभागाने आगामी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे अन्यथा निळवंडे कालवा कृती समिती या विभागाच्या विरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील असा इशारा आज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेर येथे समक्ष भेटून संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

निळवंडे प्रकल्पाच्या विविध मागण्यांचे निवेदन धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांना देताना पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत आहे.

      

“निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांच्या अस्तरीकरणाच्या निविदा निघून वर्षाचा कालखंड उलटला तरी अद्याप त्यावर वेगाने काम सुरू झालेले नाही.त्यामुळे जलद अस्तरीकरण करण्यासाठी जलसंपदा विभागाने आपल्या मशिनरी दुप्पट वाढवाव्या अन्यथा अकोले तालुक्यातील कालवा गळती होण्याचा धोका आहे”-भाऊसाहेब दादा सोनवणे,जेष्ठ कार्यकर्ते कालवा कृती समिती.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी येत्या १४ जुलै रोजी ५४ वर्ष उलटत आली असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.०५ हजार १७७ कोटींवर गेला आहे.यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने सातत्याने कागदपत्रीय व उच्च न्यायालयात पाठपुरावा करून मागील वर्षी ३१ मे २०२३ रोजी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना जलपूजन करण्यात भाग पाडले आहे.अद्याप या प्रकल्पाचे अनेक कामे बाकी असताना नेत्यांनी जलपूजनाची हौस भागवून घेतली आहे.आजही या भागातील निळवंडेच्या पाण्यावर वक्र दृष्टी ठेवणाऱ्या नेत्यांनी या वर्षीचे साडे तीन टि.एम.सी.पाणी दि.२८ एप्रिल रोजी प्रवरा खोऱ्यात पळवले आहे.याचा या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांत अच्छा-खांसा राग आहे व तो लोकसभा निवडणुकीत उमटला असल्याचे मानले जात आहे.


   दरम्यान या प्रकल्पाच्या कालव्यांच्या अस्तरीकरणाच्या निविदा निघून वर्षाचा कालखंड उलटला आहे.तरीही अद्याप त्यावर वेगाने काम सुरू झालेले नाही ही संतापजक बाब उघड झाली आहे.त्यामुळे जलद अस्तरीकरण करण्यासाठी जलसंपदा विभागाने आपल्या मशिनरी दुप्पट वाढवल्या नाही तर अकोले तालुक्यातील कालवा गळती होण्याचा धोका वाढला आहे.मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना घोषणा होऊनही वर्षाचा कालखंड उलटूनही अद्याप भरपाई दिलेली नाही ही घटना निंदनीय आहे.

निळवंडे प्रकल्पाच्या विविध मागण्यांचे निवेदन कालवा विभागाच्या उपकार्यकारी अभियंता वैशाली गायकवाड यांना देताना पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत आहे.

 

“निळवंडे प्रकल्पातील जलसाठा लाभक्षेत्रील कालवे अपूर्ण असल्याने नगर जलसंपदा विभागाकडे सन-२००८ पासून वर्ग होत होता मात्र आता कालवे पूर्ण झाल्याने सदर जलसाठा आगामी पावसाळ्यापासून निळवंडे लाभक्षेत्रात वर्ग करून पाझर तलाव,के.टी.वेअर भरून द्यावे.सदर जलसाठा आता कोणत्याही स्थितीत अ.नगर जलसंपदा विभागाकडे वर्ग करू नये”-संजय थोरात, कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती.

  या शिवाय निळवंडे डावा-उजव्या कालव्यावरील गेल्यावर्षी एच.आर.व सी.आर.च्या निविदा निघून वर्ष उलटून गेले असताना ते अद्याप पूर्ण केलेले नाही.अशाच पद्धतीने काम सुरू राहिले तर आणखी पन्नास वर्षे काम पूर्ण होऊ शकणार नाही असा धोका निर्माण झाला आहे.

  

   नाशिक येथील सी.डी.ओ.मेरीने लाभक्षेत्रातील बंदिस्त वितरण पाईप चाऱ्यांचे (पी.डी.एन.) साडे दहा हजार हेक्टरचे डिझाईन करून वर्षे उलटले असताना त्या डिझाईनवर जलसंपदा विभागाने पुढील पी.डी.एन.डिझाईनचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही.

  दरम्यान निळवंडे प्रकल्पातील जलसाठा लाभक्षेत्रील कालवे अपूर्ण असल्याने नगर जलसंपदा विभागाकडे सन-२००८ पासून वर्ग होत होता मात्र आता कालवे पूर्ण झाल्याने सदर जलसाठा आगामी पावसाळ्यापासून निळवंडे लाभक्षेत्रात वर्ग करून पाझर तलाव,के.टी.वेअर भरून द्यावे.सदर जलसाठा आता कोणत्याही स्थितीत अ.नगर जलसंपदा विभागाकडे वर्ग करून दुष्काळी शेतकऱ्यांवर अन्याय करू नये.

  अकोले तालुक्यात किमान आगामी पूरपाणी लाभक्षेत्रात पोहचविण्यासाठी कि.मी.०४ ते ०८ या जास्त गळती असलेल्या कालव्यांवर वर्तमानात केवळ तीन ठिकाणी ०४ ‘पोकलॅन’ असून ते दुप्पट करणे गरजेचे आहे.

   याशिवाय औरंगपूर मार्गे निमगाव जाळी उप कालवा गोगलगाव पर्यंत पूर्ण करावा आदी मागण्या या पदाधिकाऱ्यांसह या शेतकऱ्यांनी शेवटी केल्या आहे.  

   सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,समितीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उर्हे सर,सचिव कैलास गव्हाणे,माजी उपाध्यक्ष रमेश दिघे,मोहिनीराज शेळके,ज्ञानदेव हारदे,विलास गुळवे,बाळासाहेब सोनवणे,भाऊसाहेब दादा सोनवणे,सौरभ शेळके,भिवराज शिंदे,सचिन मोमले,अरुण मोमले,नवनाथ शिंदे,साहेबराव रहाणे,मच्छीन्द्र काळे,अनिल थेटे,उत्तमराव थोरात,संजय थोरात आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close