जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

तरुणांचा बळी घेणारी गटार नादुरुस्तच,नागरिकांची पालिकेकडे तक्रार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत  हनुमान नगर  सर्व्हे क्रं.१०५ येथे बबलू घर ते जुबिदा आपा घर दरम्यान गत महिन्यात तरुणाचा बळी घेणारी गटार अद्याप नादुरुस्तच असून पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे त्याचा जवळच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लगत आहे त्यामुळे पालिकेने तातडीने हि गटार दुरुस्त करावी अशी मागणी त्या भागातील नागरिक युसूफ वजीर पठाण यांनी पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे केली आहे.

  

  “सदर तरुणीचा बळी घेणाऱ्या गटारीचे काम कोपरगाव नगरपरिषदेने वेळेत पूर्ण केले नाही तर आपण आगामी दि.२४ नोव्हेंबर रोजी पालिकेसमोर आमरण उपोषण करणार आहे”-युसूफ पठाण,कार्यकर्ते,कोपरगाव.

त्यांनी मुख्याधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”पालिकेने सदर काम सुरु केले होते.मात्र ते अज्ञात कारणाने बंद आहे.त्यासाठी रस्ता खोदून ठेवला आहे.त्या ठिकाणी गटारीचे पाईप फुटलेले आहे.अनेक वेळा या बाबत पालिकेकडे तक्रार करूनही उपयोग झालेला नाही.त्या गटारीत पडून एक तरुण संचिन गुजर यांचा मृत्यू झाला आहे.आता पालिकेने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

  सदर गटारीचे काम कोपरगाव नगरपरिषदेने वेळेत पूर्ण केले नाही तर आपण आगामी दि.२४ नोव्हेंबर रोजी पालिकेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचे युसूफ पठाण यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close