आंदोलन
कोपरगाव बंदची हाक,…या संघटनेने तहसीलदारांना दिले निवेदन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते उपोषणासाठी बसले होते.त्यांना काल रात्री पोलिसांनी उठवण्याचा प्रयत्न केला होता.तो गावकऱ्यांनी हाणून पडला होता त्यातून वादावादी होऊन आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला असून त्याचा कोपरगाव मराठा समाज संघटनेने कोपरगाव तहसील कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त केला असून येत्या ०४ सप्टेंबर रोजी कोपरगाव बंदची हाक दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान अंतरवली येथील जाळपोळीच्या घटनेची राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगाराने दखल घेतली असून त्यांनी सकाळी ६.३० वाजता बाहेरगावी जाणाऱ्या बस थांबवल्या असून पुढे गेलेल्या बस परत मागे बोलवून घेतल्या असून राज्यातील जनतेचा गरीब रथ असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसच आगीच्या भक्ष्यस्थानी का पडत आहे असा सवाल केला आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडिगोड्री महामार्गावर जाळपोळीच्या घटना घडल्या असून अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते उपोषणासाठी बसले होते.त्यांना काल रात्री पोलिसांनी उठवण्याचा प्रयत्न केला होता.तो गावकऱ्यांनी हाणून पडला होता.मात्र आज दुपारी पुन्हा पोलिसांनी उपोषण कर्त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी प्रचंड विरोध केला.त्यामुळे पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.यानंतर पोलिसांनी लाठीचार्जही केला असल्याचे पडसाद कोपरगावसह राज्यात उंमतले असून आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मराठा समाज संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त केला असून कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले याना निवेदन दिले असून आगामी सोमवार दि.०४ सप्टेंबर रोजी,’कोपरगाव बंद’ची हाक दिली आहे.

सदर प्रसंगी माजी नगरसेवक कृष्णा आढाव,मनसेचे शहराध्यक्ष अनिल गायकवाड,डॉ.अनिरुद्ध काळे,प्रसाद आढाव,वैभव आढाव,सेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,सेनेचे माजी माजी शहराध्यक्ष भरत मोरे,सुनील शिलेदार,ऍड.योगेश खालकर,राजेंद्र वाकचौरे,शैलेश साबळे,संदीप डोखे,देवकर आदींसह बहुसंख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर प्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष अनिल गायकवाड यांनी कोपरगाव बंदची हाक दिली आहे.त्यास अन्य प्रमूख कार्यकर्त्यानी साथ दिली आहे.
दरम्यान अंतरवली येथील जाळपोळीच्या घटनेची राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगाराने दखल घेतली असून त्यांनी सकाळी ६.३० वाजता बाहेरगावी जाणाऱ्या बस थांबवल्या असून पुढे गेलेल्या बस परत मागे बोलवून घेतल्या असून राज्यातील जनतेचा गरीब रथ असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसच आगीच्या भक्ष्यस्थानी का पडत आहे असा सवाल केला आहे.