आंदोलन
कोपरगावातील…’ते’ आंदोलन अखेर मागे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात जून ते ऑगष्ट २०२२ दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.तालुक्यातील पाच मंडलापैकी सुरेगाव आणि पोहेगाव या दोन मंडलातील शेतकऱ्यांना काही भरपाई मिळाली असून उर्वरित तीन मंडळातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने अंगठा दाखविल्याने शेतकऱ्यांत मोठी नाराजी होती त्यातून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर पूर्वलक्षी प्रभावाने मदत मिळावी व भेदभाव करू नये यासाठी आंदोलन सुरु केले होते मात्र त्यात जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळे आंदोलन रद्द केले असल्याची माहिती शेतकरी नेते पद्मकांत कुदळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान यात जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की,”आधी राज्य सरकारने आपला आदेश क्रं.अतीवृष्टीसाठी दि.०८ सप्टेंबर २०२२ रोजी आदेश (क्रं.सी.एल.एस.-२०२२/प्र.क्रं.२९७/म-३/,मंत्रालय मुंबई) काढून त्यात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अनुक्रमे जिरायती,बागायती,व बहुवार्षिक पिकासाठी १३ हजार ५००,२७ हजार तर बहुवार्षिक साठी ३६ हजार निश्चित केला होता.मात्र त्यानंतर अतिवृष्टी साठी दि.२७ मार्च २०२३ रोजी दुसरा आदेश (क्रं.सी.एल.एस.-२०२२/प्र.क्रं.३४९/म-३/,मंत्रालय मुंबई) काढला असून त्यात त्यांनी अनुक्रमे जिरायती,बागायती,व बहुवार्षिक पिकासाठी ०८ हजार,१७ हजार तर बहुवार्षिक साठी २२ हजार ५०० असा निश्चित केला होता.त्यामुळे सदर गोंधळ झालेला दिसतो आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने राज्याचे कृषी मंत्री यांनी मदत देण्याची घोषणा केली होती.त्यात जिरायती शेती साठी १३ हजार ६०० रुपये हेक्टरी तर बागायतीसाठी २७ हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकासाठी ३६ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती.त्यानुसार सरकारने दि.०८ सप्टेंबर २०२२ रोजी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि सुरेगाव या दोन मंडलातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात दि.३१ मार्च २०२३ रोजी नुकसान भरपाई वर्ग केली असली तरी अद्याप ६० टक्के शेतकरी बाकी असल्याचा आरोप केला होता.तर उर्वरित कोपरगाव,रवंदे,दहिगाव बोलका आदी तीन मंडलातील २७ हजार शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहिले असून कृषी विभागाने त्याकडे कानाडोळा केला होता त्या विरोधात हे ‘आमरण उपोषण’ सुरु केले होते.त्यानंतर महसूल विभागात सूत्रे हालली होती
त्यावेळी राज्याचे महाआघाडीचे तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घोषणा करून जिरायती शेती साठी १३ हजार ६०० रुपये हेक्टरी तर बागायतीसाठी २७ हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकासाठी ३६ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती.त्यानुसार सरकारने दि.०८ सप्टेंबर २०२२ रोजी घोषणा केली होती.त्या नुसार कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि सुरेगाव या दोन मंडलातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात दि.३१ मार्च २०२३ रोजी नुकसान भरपाई वर्ग करण्यात आली होती.त्यातील काही शेतकरी अद्याप बाकी आहे.तर उर्वरित कोपरगाव,रवंदे,दहिगाव बोलका आदी तीन मंडलातील २७ हजार शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहिले असून कृषी विभागाने त्या बाबतीत मौन पाळले असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप होता.कोपरगाव तहसील कार्यालयासमोर ‘आमरण उपोषण’ सुरु झाल्यानंतर कोपरगाव येथील तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करून त्या बाबत आपण पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याशी प्रयत्नशील असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण कर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले असल्याची माहिती शेतकरी नेते पद्मकांत कुदळे यांनी शेवटी दिली आहे.
सदर आंदोलनात पद्मकांत कुदळे,प्रवीण शिंदे,तुषार विध्वंस,नितीन शिंदे,सदाशिव रासकर,अनिल शेवते,श्री देवकर,सोपान देवकर,हरिभाऊ शिंदे,दिपक देवकर,शिवाजी शिंदे,अनिल चव्हाण,केशवराव सपकाळ,बाबासाहेब रासकर,आबासाहेब गिरमे,अँड योगेश खालकर,नंदकुमार बोरावके,संदीप देवकर,सुनील देवकर,अनिल गायकवाड,छबुराव शिंगाडे आदींनी सहभाग नोंदवला होता.आता पुढील कारवाई काय होणार याकडे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.