आंदोलन
…या शहरात राजकीय नेत्यांचा निषेध करण्यासाठी लोकशाहीर साठे जयंती !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेध नोंदवून लोक स्वराज्य आंदोलनाचे वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली असल्याची माहिती अड्.नितीन पोळ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
जाती व्यवस्थेच्या चटक्याने ज्यांना अवघ्या दीड दिवस शाळेत शिक्षण मिळाले.पण,आपल्या लेखणीतून कष्टकरी, सर्वाहारा,उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे ती राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी होत असताना कोपरगावात मात्र तात्यांच्या पुतळ्याचे उदघाटन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्या जयंतीचा प्रयोग करण्यात आला असल्याची माहिती अड्.नितीन पोळ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव येथे गेल्या दहा बारा वर्षा पासून अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा व्हावा यासाठी समाजातील विविध संघटना नेते यांनी विविध पद्धतीने अर्ज,विनंत्या आंदोलने केली मागील दिड वर्षांपूर्वी नियोजित जागेवर पुतळा बसवण्यात आला मात्र नगर पालिकेचे विसर्जन झाल्याने पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न करता पुतळा झाकून ठेवला अखेर समाज बांधवांचा उद्रेक होऊन मागील वर्षी पुतळा समाज बांधवांनी आंदोलन करून खुला केला मात्र एक वर्ष होऊन गेले तरी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले नाही.तालुक्यातील राजकीय नेत्यांनी निवडणुकीत समाजाच्या मतांवर डोळा ठेऊन समाज बांधवांची दिशाभूल केली गेली.राजकीय नेत्यांनी जाणीव पूर्वक समाज बांधवांमध्ये वाद तेवत ठेऊन पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होऊ दिले नाही.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मला लढा मान्य आहे,रडगाणे मान्य नाही या विचारांचा वारसा घेऊन काम करणाऱ्या लोक स्वराज्य आंदोलन या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज गळ्यात पाटी अडकवून व तोंडाला काळी पट्टी बांधून राजकीय नेत्यांचा निषेध नोंदवला जयंती निमीत्ताने अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनेक अण्णा भाऊ साठे प्रेमींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे कोपरगाव शहारत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.