अभिष्टचिंतन कार्यक्रम
माजी.आ.काळे यांचा…या उपक्रमाने वाढदिवस साजरा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे महाविद्यालयात सालाबादप्रमाणे याहीवर्षी माजी आ.अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले आहे.या शिबिरात एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून यामध्ये विद्यार्थींनीनी देखील रक्तदान केले असल्याची माहिती प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सुशीलामाई काळे महाविद्यालयात रक्तदान शिबिर प्रसंगी विश्वस्त सिकंदर चांद पटेल,प्राचार्या डॉ.विजया गुरसळ व विद्यार्थी रक्तदान करतांना दिसत आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सिकंदर चांद पटेल यांच्या हस्ते करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ होत्या.
सदर प्रसंगी प्राध्यापक,प्राध्यापिका,विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
यावेळी संजीवनी ब्लड बँकेच्या संचालिका डॉ.नीता पाटील रक्तदानाचे महत्त्व पटवून देत रक्तदाना बद्दल असलेले गैरसमज दूर केले.रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून रक्तदात्याच्या शरीरातल्या एकूण रक्ताच्या ५ टक्केच रक्त दान करता येते.शरीरात २४ तासात पुन्हा तेवढे रक्त तयार होत असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यास त्यांना प्राणाला देखील मुकावे लागू शकते.त्यामुळे रक्तदान हे सर्वात मोठे पुण्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर प्रसंगी प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी,” सुशीलामाई काळे यांच्या आग्रहामुळे कर्मवीर शंकरराव काळे यांनी महाविद्यालय सुरू केल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाला वाव मिळाला माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचे महत्व अधोरेखित करून रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी तसेच प्राध्यापकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.भाऊसाहेब कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ऐश्वर्या भागवत व कु.अनुष्का पवार यांनी केले तर आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ.संतोष जाधव यांनी मानले आहे.