जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

किंमती कार जळून खाक,कोपरगावात गुन्हा नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिडी-नाशिक रस्त्यावर चांदेकसारे शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास एक ‘स्कोडा’ कंपनीची सुमारे ५ लाख रुपये किंमतीची कार जळून खाक झाली असल्याची फिर्याद संबंधित कार मालक सागर बबन पाटील (वय-३१) रा.चांदणी मंडलिक नगर नाशिक याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असल्याचे समजते.या बाबत घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून स्थळ पंचनामा सुरु केला आहे.याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

फिर्यादी हा आपली स्कॉडा कार (क्रं.एम.एच.१५ बी.एक्स.६२१०) हि घेऊन नाशिक वरून शिर्डीला श्री साईबाबा समाधी दर्शनाला शनिवार दि.२४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या कारला चांदेकसारे शिवारात आहेर वस्तीसमोर अचानक आग लागली होती.त्यानंतर त्याने सावधगिरी बाळगत त्यातील व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढून वाचवले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हा आपली स्कॉडा कार (क्रं.एम.एच.१५ बी.एक्स.६२१०) हि घेऊन नाशिक वरून शिर्डीला श्री साईबाबा समाधी दर्शनाला शनिवार दि.२४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या कारला चांदेकसारे शिवारात आहेर वस्तीसमोर अचानक आग लागली होती.त्यानंतर त्याने सावधगिरी बाळगत त्यातील व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढून वाचवले आहे.मात्र या दूर्घटनेत मात्र कार जळून खाक झाली आहे.सदर गाडी हि सन-२००८ चे मॉडेल असून त्याची किंमत ५ लाख रुपये आहे.

या प्रकरणी फिर्यादी इसम सागर पाटील याने आज सकाळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना दिली आहे.

दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सहाय्यक उपनिरीक्षक महेश कुसारे यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवले असून त्यांनी धाव घेऊन पंचनामा सुरु केला आहे.पंचनाम्यानंतर खरी स्थिती समोर येण्यास मदत मिळणार आहे.मात्र या घटनेने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

बातमी अद्यावत होत आहे….

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close