जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

पुरात वाहून गेला तरुण,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यासह राज्यात पावसाने कहर उडवून दिला असून यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे मात्र काल दुपारी २ च्या सुमारास उत्तर प्रदेश येथून रवंदे येथे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आलेला तरुण जितुकुमार सुभाष चंद (वय-२४) रा.महाराजपुर उत्तर प्रदेश हा रवंदे येथे नदीवर अंघोळीस गेला असता आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेला आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील अगस्ती नदीस आलेला पूर व यानेच तरुणांचा घेतला बळी.

कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत अगस्ती नदीवर दुपारी २ च्या सुमारास एक उत्तर प्रदेश येथील तरुणासह काही कटुंब आपला उदरनिर्वाह व मोलमजुरी करण्यासाठी आलेले आहे.त्यातील एक तरुण जितुकुमार सुभाष चंद हा गावापासून उत्तरेस एक कि.मी.अंतरावर असलेल्या अगस्ती नदीवर दैनंदिन प्रथे प्रमाणे आपल्या अन्य सहकाऱ्यांसमवेत पोहण्यास गेला होता.त्याचा तेथील बंधाऱ्याच्या भिंतीवरून पाय घसरून पडला होता त्यात त्याचा बळी गेला आहे.

नगर जिल्ह्यात आजपर्यंत ५१८.६ मि.मी. (११५.७ %) पर्जन्यमान झालेले आहे.वादळी वारा,मेघगर्जनेसह वीजा पडणे व मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अ.नगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.अ.नगर,पुणे व नाशिक जिल् हयातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरु असून अतिवृष्टी झाल्यास धरणाद्वारे सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.नदी,ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे.पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या असताना काल कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत अगस्ती नदीवर दुपारी २ च्या सुमारास एक उत्तर प्रदेश येथील तरुणासह काही कटुंब आपला उदरनिर्वाह व मोलमजुरी करण्यासाठी आलेले आहे.त्यातील एक तरुण जितुकुमार सुभाष चंद हा गावापासून उत्तरेस एक कि.मी.अंतरावर असलेल्या अगस्ती नदीवर दैनंदिनप्रथे प्रमाणे आपल्या अन्य सहकाऱ्यांसमवेत पोहण्यास गेला होता.त्याचा तेथील बंधाऱ्याच्या भिंतीवरून पाय घसरून पडला होता व पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने तो वाहून गेला होता.

दरम्यान हि बातमी त्याच्या सहकाऱ्यांनी तेथील पोलीस पाटील विलास मोरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.त्यानंतर त्यांनी ती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे लक्षात आणून दिल्यावर ते स्वतःसह अधिकारी व पोलीस घटनास्थळी घेऊन आले होते.मात्र त्याचा शोध घेतला असता आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी त्यास ताब्यात घेऊन आज कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकांऱ्यानी त्यास मृत घोषित केले आहे.त्याची उत्तरीय तपासणी करून त्याचा मृतदेह जवळच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.त्यास घेऊन ते उत्तर प्रदेश येथे रवाना झाले आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आपल्या दप्तरी खबर देणार ललतेश कुमार माननसिंध याच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद दप्तरी दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.डी.बोटे हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close