जाहिरात-9423439946
अपघात

…’त्या’ आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   मुंबई-नागपूर महामार्गावरील एस.जे.एस.हॉस्पिटलजवळ दोन दिवापूर्वी सकाळी १२ वाजता झालेल्या भीषण अपघातात महिंद्रा स्कॉर्पिओ (एम.एच.१२ एन.झेड.००५७ ) हीने मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जात असताना कातकडे पेट्रोल पंपाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सुनंदा सुदाम साबळे (वय -५६) ही महिला मृत तर सुदाम काशिनाथ साबळे व त्यांची भावजय हिराबाई वसंतराव साबळे हे दोन जण जखमी झाले होते कोपरगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील मद्यधुंद आरोपी चालक अमोल अशोक खांडगे (वय -३४) यास अटक केली आहे.

दुर्घटनाग्रस्त स्कॉर्पिओ गाडी दिसत आहे.

  

दरम्यान तपासात आरोपी चालक अमोल खांडगे हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने त्याचे विरुध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा कलम १०५ दाखल केला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.जालिंदर तमनर हे करत आहेत.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,मुंबई-नागपूर महामार्गावरील एस.जे.एस.हॉस्पिटलजवळ दि.११ मार्च रोजी सकाळी १२ वाजता भीषण अपघात झाल होता.यात भरधाव असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ (एम.एच.१२ एन.झेड.००५७ ) ही मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जात असताना तिच्यावर असेलल्या चालक मद्यधुंद होता.त्यामुळे त्याचे त्या वाहनावर  असलेले नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सदर स्कॉर्पिओ गाडी साई जनार्दन हॉटेल जवळील आकाश गोंदकर याचे मालकीचे गोदावरी स्टॉलमध्ये घुसली होती त्यात त्या स्टॉल चे मोठे नुकसान होऊन त्यांच्या भावाचे दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते.त्यात सुनंदा सुदाम साबळे या महिलेसह हिराबाई वसंतराव साबळे,सुदाम काशिनाथ साबळे हे आपल्या नातवाला शिर्डीत भेटण्यास जात असताना गंभीररीत्या जखमी झाले होते.उपचारा दरम्यान सुनंदा साबळे या मृत पावल्या होत्या.तर त्यांच्या हिरो अच्युर दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.एच.१५७०) हिचे मोठे नुकसान झाले होते.घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली होती.

   दरम्यान या घटनेबाबत फिर्यादी मधुकर काशिनाथ साबळे (वय -५८) रा.संवत्सर यांनी स्कॉर्पिओ आरोपी चालक अमोल खांडगे याचे विरुध्द गुन्हा क्रं.१०८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०६(१),२८१,१२५,(ब),३२४(५) सह कलम १८४,१८५ मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

  दरम्यान तपासात आरोपी चालक अमोल खांडगे हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने त्याचे विरुध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा कलम १०५ दाखल केला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.जालिंदर तमनर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close