अपघात
दुचाकी अपघात,एक ठार,दोन जखमी !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील मूळ रहिवासी असलेला तरुण श्रीकांत कैलास क्षीरसागर (वय-34) यांचे नुकतेच दोन दुचाकीच्या अपघातात निधन झाले आहे.असून अन्य दोन जण जखमी झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील रहदारिसाठी महत्वाच्या रस्त्यांची वाट लागली आहे.किरकोळ पावसाने रस्ते नको-नको म्हणायला लागतात अशी अनेक उदाहरणे आहेत.त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव हकनाक गमवावा लागत आहे.अशीच घटना कोपरगाव-श्रीरामपूर मार्गावर घडली आहे.
दरम्यान यात दोन दुचाकीचा अपघात होऊन त्यात कोकमठाण येथील मूळ रहिवासी असलेला तरुण श्रीकांत क्षीरसागर हा गंभीर जखमी झाला होता.त्यावर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मृत्यू पावला आहे.त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.या दुर्घटनेत अन्य दोन जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.मारत त्यांची नावे समजू शकली नाही.मयत तरुण हा पुणतांबा येथील योगी चांगदेव महाराज यांच्या मंदिरानजिक असलेले दत्त मंदिराचे पुजारी कैलास क्षीरसागर यांचा एकुलता एक मुलगा होता.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.