जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

एकाचा मृत्यू,खून की आत्महत्या चर्चेला उधाण !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)


कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संवत्सर शिवारात रेल्वे रुळावर आज सकाळी 5.45 पूर्वी पोल क्रमांक 454/13 जवळ 30-35 वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याने आत्महत्या केली की त्याचा कोणी अज्ञात इसमाने खून केला याचा उलगडा पोलिसांना झाला नाही.त्यामुळे या घटनेबाबत शहर आणि तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

   

दरम्यान मिळालेल्या एका माहितीनुसार सदर इसमाचे नाव गिरधारी अंतलाल महतो असे नाव असून तो हा झारखंड राज्यातील रहिवासी असून तो मजूर म्हणून या ठिकाणी आला होता.मात्र तो घटनास्थळी का व कसा गेला ही माहिती त्यांच्या अन्य साथीदारांना सांगता आली नाही.त्यामुळे विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,दौंड ते मनमाड हा रेल्वे मार्ग आता दुहेरी झाला असून तो जवळपास सर्व विद्युतीकरण होत आला असून या मार्गावर रेल्वे गाड्यांची अवाक जवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून अनेक जणांचे काही महिन्याच्या अंतराने मृतदेह आढळून येत असून त्यात काहीजण आपल्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहेत तर काहींचा खून करून सदर इसमांचे मृतदेह रेल्वेच्या मार्गावर आणून टाकल्याची उदाहरणे आहे.अशीच घटना आज सकाळी 5.45 पूर्वी संवत्सर शिवारात उघड झाली असून रेल्वे अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलिसांना खबर देऊन रेल्वे मार्गावर पोल क्रमांक 454/13 जवळ 30-35 वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती दिली होती.त्यानुसार घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने धाव घेतली होती.त्यावेळी त्या ठिकाणी एक अंदाजे वरील वय असलेला इसम मृत अवस्थेत आढळून आला आहे.त्यांनी सदर ठिकाणी स्थळपंचनामा करून सदर मयत इस्माचे प्रेत ताब्यात घेऊन त्याची रवानगी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात केली होती.

   त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत सदर इसमाच्या पायाला,हाताला,व शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या असून त्या असह्य जखमांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचा कयास व्यक्त होत आहे.तथापि सदर मयताचा मृत्यू नेमका कशाने झाला आहे.याचा बोध झालेला नाही.त्यामुळे सदर इसम नेमका कुठला तो रेल्वे मार्गावर कशासाठी गेला? की त्यास कोणी हाणमार करून नेऊन टाकलां याची उत्तरे मिळणे गरजेचे झाले आहे.त्यामुळे या घटनेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके,पो.हे.को.तमनर आदिनी भेट दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव रेल्वे स्थानक प्रबंधक बी.एन.प्रसाद यांच्या खबरी वरून शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक 63/2024 भारतीय न्याय संहिता कलम 194 प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.जे.पी.तमनर हे करत आहेत.

   दरम्यान मिळालेल्या एका माहितीनुसार सदर इसमाचे नाव गिरधारी अंतलाल महतो असे नाव असून तो हा झारखंड राज्यातील चितपुर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असून तो मजूर म्हणून या ठिकाणी आला होता.मात्र तो घटनास्थळी का व कसा गेला ही माहिती त्यांच्या अन्य साथीदारांना सांगता आली नाही त्यामुळे विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close