जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

दुचाकीस अपघात,एक ठार,पोलिसांत नोंद

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील कोर्टरोड येथील रहिवासी इसम गयास इनायतखान पठाण (वय -46) यांचा देरडे कोऱ्हाले ते चांदेकसारे दरम्यान रोडवर त्यांचा अपघात झाला होता.त्यांना उपचारार्थ लोणी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यात त्याचे निधन झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी या प्रकरणी कोपरगाव पोलिसांना याची खबर दिली आहे.त्याप्रमाणे कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात नोंद केली आहे.

मयत इसम गयास पठाण हे दिनांक 28 ऑगस्ट रोजी नाशिक येथे आपल्या नातेवाईकांकडून रक्कम आणण्यासाठी गेले होते.येताना त्यास त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले होते.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत इसम गयास पठाण हे दिनांक 28 ऑगस्ट रोजी नाशिक येथे आपल्या नातेवाईकांकडून रक्कम आणण्यासाठी गेले होते.येताना त्यास त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले होते.मात्र गंभीर दुखापत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना वाचविण्यात अपयश आले आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील दफन भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात लोणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.याबाबत अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अस्कमात मृत्यू नोंद क्रमांक-59/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 194 प्रमाणे नोंद दाखल केली आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.बी.एच. तमनर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close