अपघात
अज्ञात वहानाची धडक,एक ठार,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत नगर-मनमाड रस्त्यावर जुन्या डाव्या कालव्याजवळ आज पहाटे ३.३० च्या पूर्वी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक अनोळखी इसम (वय-५५) जागीच ठार झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड हा महामार्ग राष्ट्रीय महामार्गात वर्ग करण्यात आला असून सावळीविहिर ते इंदोर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग टायर करण्याचे काम वेगाने सुरु आहे.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक एक मार्गी करण्यात येत आहे.त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.मात्र कोपरगाव ते येवला हा मार्ग अद्याप विकसित झालेला नाही.मात्र पूर्वीचा महामार्ग चांगला असल्याने अनेक वाहन चालक वेगाची मर्यादा पाळताना दिसत नाही त्यामुळे अनेक अपघातांना निमंत्रण मिळताना दिसत आहे.अशीच घटना आज दि.१८ मार्च रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास येसगाव शिवारात गोदावरी डाव्या कालव्यानजीक घडली आहे.त्यात तालुका पोलीस गस्तीवर असताना त्यांच्या लक्षात आली आहे.त्यांनी एक इसम या ठिकाणी पडलेला आढळून आला होता.त्या ठिकाणी पाहणी केली असता तो मृत आढळून आला आहे.
त्यास तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत उपचारार्थ भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी,सहाय्यक फौजदार अशोक आंधळे आदींनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी पोलीस कॉ.राजू दगडू शेख यांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा ८३/२०२४ भा.द.वि.२७९,३०४(अ),३३८मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४(ब) प्रमाणे दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक आंधळे हे करत आहेत.