जाहिरात-9423439946
अपघात

समृद्धीवर भीषण अपघात,तीन जागीच ठार,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री कारने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली होती होती.अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले होते. मयत कारचालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवून तसेच रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करीत स्वत:सह तीघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मयत कारचालक उमेश दामोधर उगले (वय २८, रा. भातोडी, ता. जाफराबाद, जि. जालना) याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने कोपरगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    

या भीषण अपघातात कार चालक उमेश उगले,राहुल श्रीमंत राजभोज (वय ३५, रा.निमखेडा,ता.जाफराबाद),भाऊसाहेब नामदेव पैठणे (वय ३५,रा.दहेगाव,ता.जाफराबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.तर शिवहरी पांडुरंग वाघ (वय ५५,रा.टेंभुर्णी,ता.जाफराबाद) व रविंद्र मनसुखलाल फलके (वय ३३, रा. तपोवन, ता. जाफराबाद) हे गंभीर जखमी झाले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,”जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील उमेश दामोधर उगले हे मारुती कंपनीच्या ‘स्विफ्ट डिझायर’ कारमधून (एमएच २१ बीएफ ९२४८) मित्रांसमवेत शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने येत होते.कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात चॅनल नंबर ५०४ जवळ असताना समोर असलेल्या कंटेनरला (एम.एच.४६ ए.एफ.९८३३) पाठीमागून जोराची धडक दिली होती.सदरची धडक इतकी जोराची होती की,कारचा पुढील भाग चक्काचूर झाला होता.

   या अपघातात कार चालक उमेश उगले,राहुल श्रीमंत राजभोज (वय ३५, रा.निमखेडा,ता.जाफराबाद),भाऊसाहेब नामदेव पैठणे (वय ३५,रा.दहेगाव,ता.जाफराबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.तर शिवहरी पांडुरंग वाघ (वय ५५,रा.टेंभुर्णी,ता.जाफराबाद) व रविंद्र मनसुखलाल फलके (वय ३३, रा. तपोवन, ता. जाफराबाद) हे गंभीर जखमी झाले होते.

   सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच महामार्ग पोलीस उपनिरिक्षक समाधान भाटिवाल,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती.मयत तीघांचे मृतदेह शुक्रवारी रात्री शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.शवविच्छेदन व इतर प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर शनिवारी दुपारी दिड वाजता तीघांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.याप्रकरणी दत्तात्रय रामदास सवडे (रा. नांदखेडा,ता.जाफराबाद,जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून मयत कारचालक उमेश उगले विरूद्ध अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close