जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपला विकास साधावा-आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायात पदार्पण करावे व आपला व्यवसाय यशस्वी करून आर्थिक भरभराट करावी असे आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी नुकतेच संवत्सर येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“नुकतीच संपन्न झालेली निवडणूक हि सर्व जागांवर यशस्वी व्हायला हवी होती मात्र त्यात मिठाचा खडा पडला आहे.तीस वर्षांपासून गावात विकास कामे मोठ्या प्रमाणावर केला आहे.त्यात या पुढेही खंड पडू दिला जाणार नाही.पायाभूत रस्ते,आरोग्य सेवा,अंगणवाडी,पाणी पुरवठा,व्यापारी पेठ विकास करण्याचे काम केले आहे.काही कामे राहिली असतील तर ती या पुढील काळात राबविली जाईल”-राजेश परजणे, सदस्य जिल्हा परिषद.

राज्यातील १४ हजार २४३ ग्रामपंचायतींची नुकतीच निवडणूक संपन्न झाली असून सरपंच निवडही नुकतीच संपन्न झाली आहे.त्याला कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायतही अपवाद नाही.संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुलोचना दिलीप ढेपले व उपसरपंचपदी विवेक परजणे यांची निवड बिनविरोध संपन्न झाली आहे.या नूतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा नुकताच सत्कार ग्रामस्थांनी आयोजित केला होता.त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे हे होते.

सदर प्रसंगी खंडू पाटील फेफाळे,बाजार समितीचे संचालक भरत बोरणारे,सोमनाथ निरगुडे,लक्ष्मण साबळे,मधुकर साबळे,गट शिक्षणाधिकारी श्री काळे,शेख मॅडम,शिंदे सर,श्री निळे,श्री भांड,प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.पारखे,माजी उपसरपंच श्री चंद्रकांत लोखंडे,केशवराव भाकरे,लक्ष्मण परजणे, सूर्यभान परजणे,बाळासाहेब दहे,संभाजी आगवन,बापू तिरमखे,काका गायकवाड,अनिल आचारी,बंडू आचारी,ज्ञानेश्वर कासार,सुभाष लोखंडे,निवृत्ती लोखंडे,अविनाश गायकवाड,कारभारी दैने,पन्ना नेहे,अरविंद जगताप,अर्जुन तांबे, दिनेश दिंडे,गणेश साबळे,भाऊसाहेब साबळे,आदी मान्यवरांसह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”गावांसाठी स्व.नामदेवराव परजणे यांनी नेहमीच चांगले काम केले त्यांचे संस्कार आम्हा भावंडावर झाले आहे.त्याना दिन दलित जनतेबाबत कायम कळवळा होता.त्यांचा समर्थ वारसा आज परजणे कुटुंब यशस्वीपणे चालवत आहे.त्यांना ग्रामस्थांनी चांगली साथ द्यावी गावाचा त्या मुळे विकास होऊन गाव संपन्न होईल असा आशावादही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक दिलीप ढेपले यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चांगदेव ढेपले यांनी केले आहे.उपस्थितांचे आभार बाजार समितीचे संचालक भरत बोरणारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close