जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

मतदार संघातील पायाभूत सुविधांची सोय करण्याचा प्रयत्न-माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदार संघातील लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील रस्ते,पाणी,वीज या पायाभूत सुविधांची सोय करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच तालुक्यातील भोजडे येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला दिलेली बहुतांश आश्वासने मागील साडे तीन वर्षात पूर्ण केली आहे.उर्वरित आश्वासने देखील लवकरच पूर्ण होणार असून त्यासाठी पाठपूरावा सुरु आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे विविध योजनांअंतर्गत २३.७५ लक्ष रुपये निधीतून गावअंतर्गत सौर पथदिवे बसवणे,नागरी सुविधा केंद्र इमारत तसेच ओपन जिम साहित्याचे लोकार्पण व सौदागर एकता एज्युकेशन सोसायटीच्या भोजडे शाखेचे उदघाटन त्यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर,भाऊसाहेब सिनगर,अॅड.भालेराव,सुधाकर वादे,दत्तात्रय सीनगर,मोहसीन सय्यद,वाल्मीक सिनगर,विजय साबळे,सचिन घनघाव,अजित सीनगर,दत्तात्रय सिनगर,दिलीप सिनगर,संतोष सिनगर,बाळासाहेब सिनगर,विक्रम मंचरे,मिथुन गायकवाड,अजय पवार,किरण आहेर,तौफिक शेख ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला दिलेली बहुतांश आश्वासने मागील साडे तीन वर्षात पूर्ण केली आहे.उर्वरित आश्वासने देखील लवकरच पूर्ण होणार असून त्यासाठी पाठपूरावा सुरु आहे.ज्या प्रमाणे सर्व जाती धर्माच्या नागरिकांशी काळे परिवाराचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत त्याप्रमाणे मुस्लीम समाजाशी देखील आपुलकीचे नाते आहे. काळे परिवाराची हि परंपरा पुढे सुरु ठेवून मतदार संघातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्या असून भोजडेच्या मुस्लीम समाजाच्या मागण्या देखील पूर्ण करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर यांनी केले आहे.तर सूत्रसंचालन भाऊसाहेब सिनगर यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाळासाहेब सिनगर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close