दळणवळण
शहाजापूर ते सात मोऱ्या या रस्त्यासह तालुक्यातील रस्त्यांसाठी पाठपुरावा सुरु-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचे शहाजापूर पर्यंत काम पूर्ण झाले असून शहाजापूर ते सात मोऱ्या (कोपरगाव तालुका हद्द) या रस्त्यासह सर्व रस्त्यांसाठी पाठपुरावा करीत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“राज्यमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती.नागरिकांना व वाहनचालकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून देर्डे फाटा ते सात मोऱ्या (कोपरगाव तालुका हद्द) या रस्त्याला निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून राज्यमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचे शहाजापूर पर्यंत काम पूर्ण झाले आहे.तसेच ब्राम्हणनाल्यावरील पुलासाठी देखील निधी मिळवून या पुलाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे”-आ.आशुतोष काळे.कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील बक्तरपुर येथे जलजीवन मिशन अंतर्गत ५१.६१ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन,२० लक्ष रुपये निधीतून सोमठाणे रोड,बक्तरपुर चौफुली ते मुरलीधर सानप घर रस्ता व ओपन जिम साहित्याचे लोकार्पण तसेच वडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत ३६.५५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व ९.६५ लाख रुपयांच्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ.मच्छिंद्र बर्डे,सचिन चांदगुडे,सुनील मांजरे,श्रीराम राजेभोसले,माजी संचालक मिननाथ बारगळ,भास्करराव चांदगुडे,दिलीप चांदगुडे,प्रभाकर चांदगुडे,खंडेराव सोनवणे,सोमनाथ चांदगुडे, अशोकराव माळी, महेश आहेर,पंचायत समिती वाघ,सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता गाडे,ग्रामसेवक एफ.एम.तडवी,एस.बी.पटाईत आदींसह वडगाव व बक्तरपूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राज्यमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती.नागरिकांना व वाहनचालकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून देर्डे फाटा ते सात मोऱ्या (कोपरगाव तालुका हद्द) या रस्त्याला निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून राज्यमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचे शहाजापूर पर्यंत काम पूर्ण झाले आहे.तसेच ब्राम्हणनाल्यावरील पुलासाठी देखील निधी मिळवून या पुलाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.शहाजापूर ते सात मोऱ्या (कोपरगाव तालुका हद्द) या रस्त्यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला असला तरी या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट घेवून या रस्त्याला तातडीने निधी मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे.तसेच झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्यासाठी देखील निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले आहे.
याप्रसंगी बक्तरपुर येथील काशिनाथ सानप,संजय सानप,विजय सानप,अशोक जाधव व संदीप आव्हाड यांनी आ.काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.