जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

कोपरगाव-नगर महामार्गावर नागरिकांचे बळी,अभियंत्यावर गुन्हा दाखल करा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव-अ.नगर हा महामार्ग हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झालेला असताना त्या कडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे परिणामस्वरूप या रस्त्यावर खड्डे पडून त्यावर अनेक नागरिकांचे बळी गेले आहे.त्यामुळे यात प्राधिकरणाचे अभियंते जबाबदार धरून त्यांच्यावर संदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी कोपरगाव येथील कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.त्यामुळे महामंडळातील अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

“कोपरगाव-नगर हा राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहनांसाठी वाहतूक करण्यासाठी योग्यतेचा राहिलेला नाही,उच्च न्यायालयाने आदेशित करूनही या रस्त्याचे काम पूर्ण केलेले नाही.सदर रस्ते हे वेळेत व गुणवत्तापुर्ण करणे हि जबाबदारी प्राधिकरणाच्या अभियंत्यांची होती.मात्र त्यांनी ते पूर्ण क्षमतेने केले नाही.त्या बाबत त्यांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही.त्यामुळे हि जबाबदारी त्यांच्यावर निश्चित होत असून त्याला जबाबदार तेच असल्याने त्यांच्यावर भा.द.वि.कलम २९९,३०४,३०५,व १२०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करावा”-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते,कोपरगाव.

राष्ट्रीय महामार्ग (रा.म.) हे भारतातील मुख्य रस्ते आहेत.राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० कि.मी. पसरले आहे.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही भारत सरकारच्या नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था आहे.ही राष्ट्रीय महामार्गांच्या विकास,बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे.भारताच्या एकूण रस्त्यांच्या फक्त २ टक्के रस्ते रा.म.आहेत,पण एकूण रस्ता वाहतुकीच्या ४० टक्के वाहतुकीसाठी ते कारणीभुत आहेत.कोपरगाव-अ.नगर हा महामार्ग काही वर्षांपूर्वी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.मात्र यावर कायम खड्ड्यांचे साम्राज्य रहात असून अनेक नागरिकांचे बळी गेले आहे.पहिल्यांदा हा मार्ग २००० साला नंतर राज्याच्या बांधकाम विभागाने चौपदरी करण्याचा निर्णय घेऊन त्याचे उदघाटन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते.त्यानंतर उत्तर नगर जिल्ह्यातील अनेक मंत्री त्यात सहभागी झाले मात्र हा रस्ता केवळ उदघाटने करण्याचे साधन बनला.त्यावर कधीच दर्जेदार काम झाले नाही.त्यामुळे हा रस्ता तथा महामार्ग कायमच नरबळी घेणारा ठरला आहे.मात्र त्याचे सोयरसुतक कधीच वर्तमान पुढाऱ्यांना वाटले नाही.अखेर संजय काळे यांनी याबाबत काही वर्षांपूर्वी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करून त्यात दाद मागितली होती.त्यावर न्यायालयाने आदेश देऊन तात्पुरती डागडुजी झाली मात्र कायम स्वरूपी त्यावर कधीच तोडगा निघाला नाही.

हा महामार्ग शिर्डी मार्गे नगर-सिन्नर असा राष्ट्रीय महामार्ग म्हणून त्यास तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंजुरी आणली होती.त्यासाठी सिन्नरकडून शिर्डी पर्यंत बहुतांशी काम झाले आहे.मात्र नगरकडून मात्र या महामार्गाची कायम उपेक्षा झाली आहे.त्यावर कधीच कायमस्वरूपी उपाय योजना न झाल्याने अखेर वैतागून संजय काळे यांनी हा प्रश्न उच्च न्यायालयात नेला होता.उत्तरेतील प्रस्थापित नेत्यांनी केवळ रस्त्याचे खड्डे बुजविण्याच्या धन्यता मानली व छायाचित्र काढून वर्तमान पत्रात व माध्यमात आपल्या छबी छापल्या कृती मात्र शून्यच ठरली आहे.यात न्यायालयाने आदेश दिला खरा पण तो काही महिनेच ठरला असे म्हणणे संयुक्तिक होईल.याबाबत काळे यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही उपयोग न झाल्याने अखेर त्यांनी नुकताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत एक तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करून भारतीय रस्ते विकास प्राधिकरणाला जाग आणण्याचे ठरवले असले तरी प्राधिरकरण आता काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नगर यांनी विनंती करून सदर रस्त्यावरील वाहतूक हि दि.१५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर पर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे कळवले असल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.त्यामुळे हा रस्ता अवजड वाहनांसाठी वाहतूक करण्यासाठी योग्यतेचा राहिलेला नाही,उच्च न्यायालयाने आदेशित करूनही या रस्त्याचे काम पूर्ण केलेले नाही.सदर रस्ते हे वेळेत व गुणवत्तापुर्ण करणे हि जबाबदारी प्राधिकरणाच्या अभियंत्यांची होती.मात्र त्यांनी ते पूर्ण क्षमतेने केले नाही.त्या बाबत त्यांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही.त्यामुळे हि जबाबदारी त्यांच्यावर निश्चित होत असून त्याला जबाबदार तेच असल्याने त्यांच्यावर भा.द.वि.कलम २९९,३०४,३०५,व १२०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करावा तसा आपल्याला याचिकेमुळे अधिकार असल्याचे संजय काळे यांनी बजावले आहे.यात पोलिसांना अधिकचे काम वाढले असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close