जाहिरात-9423439946
दळणवळण

कोपरगाव तालुक्यातील… हा रस्ता लागला मार्गी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव मतदार संघातील लौकी गावातील अत्यंत महत्त्वाचा असलेला जुना नागपूर-मुंबई हाय-वे ते भवर कदम वस्ती या रस्त्याचे काम आ.आशुतोष काळे यांनी मार्गी लावले असून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्याबद्दल लौकी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी आ.काळे यांचे आभार मानले आहे.

लौकी येथील जुना नागपूर-मुंबई हाय-वे ते भवर कदम वस्ती या रस्त्याचे भूमिपूजनप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ.

  

या रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थी,शेतकरी,वृद्ध नागरिक तसेच रुग्णांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.परंतु रस्ता करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे त्यावर मार्ग निघत नव्हता.त्याबाबत लौकी ग्रामस्थांनी त्यांच्या अडचणी आ.काळे यांच्याकडे मांडल्या होत्या.त्याची दखल घेवून या रस्त्याच्या कामासाठी येणाऱ्या अडचणी आ.आशुतोष काळे यांनी दूर केल्या आहेत.

  कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून त्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.त्याला लोकी येथील जुना नागपूर-मुंबई हाय-वे ते भवर कदम वस्ती हा रस्ता अपवाद नव्हता.गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत बिकट अवस्थेत होता.मोठे खड्डे,धूळ,पावसाळ्यात चिखल यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.शाळकरी विद्यार्थी,शेतकरी,वृद्ध नागरिक तसेच रुग्णांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.परंतु रस्ता करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे त्यावर मार्ग निघत नव्हता.त्याबाबत लौकी ग्रामस्थांनी त्यांच्या अडचणी आ.काळे यांच्याकडे मांडल्या होत्या.त्याची दखल घेवून या रस्त्याच्या कामासाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्या. संबंधित सर्व प्रशासकीय मान्यता या रस्त्यासाठी मिळवून दिल्यामुळे या रस्त्याच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.

   सुमारे साडेसातशे मीटर लांबीच्या या रस्त्यासाठी आमदार निधीतून आवश्यक निधी दिला आहे.आजतागायत या रस्त्यास कोणत्याही प्रकारचा शासकीय निधीचा लाभ मिळू शकला नव्हता.अनेक वर्षे या परवानग्या आणि निधी अभावी रस्त्याचे काम रखडले होते.मात्र हा प्रश्न आता सुटणार असल्यामुळे लौकी ग्रामस्थांमध्ये विशेषत: प्रभाग क्रमांक तीनच्या नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

   सदर उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे संचालक शिवाजी शेळके,सरपंच अंजीनाथ खटकाळे,उपसरपंच किरण शेळके,राजेंद्र खिलारी,यशवंत कदम, त्र्यंबक खटकाळे,सागर खटकाळे,बाबासाहेब खटकाळे,अंबादास खटकाळे,मच्छिंद्र इंगळे,सुजित कदम,भाऊसाहेब गोडसे,बबन भवर,भाऊसाहेब भवर,वाजिनाथ कदम, सावळीराम खटकाळे,विलास इंगळे,सुभाष कदम आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. याबाबत लौकी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close