दळणवळण
…या मार्गावर नवीन बस सुरू,ग्रामस्थांनी केले स्वागत

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे संगमनेर मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यास अत्यंत महत्वाची भूमिका निभावणारी कोपरगाव ते जवळके ही बस जवळके ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार नुकतीच राज्य परिवहन महामंडळाच्या कोपरगाव बस आगाराने सुरू केल्याने जवळके आणि परिसरातील ग्रामस्थांनी तिचे जोरदार स्वागत केले आहे.

“दरम्यान नवीन बस सुरू केल्याबद्दल विभागीय नियंत्रक यांचेसह कोपरगाव बस आगाराचे व्यवस्थापक अमोल बनकर आदींचे आभार मानले असून शिर्डी ते नाशिक शटल बस व श्रीरामपूर ते पिंपळगाव बसवंत ही बस सुरू झालेली नाही ती राज्य परिवहन मंडळाने तातडीने सुरू करावी”- सारिका थोरात,सरपंच,जवळके ग्रामपंचायत.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे एकूण २५१ डेपो आणि ३१ विभागांचे विशाल नेटवर्क असून १४,५०० हून अधिक बसेस चालवल्या जातात.पण,त्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहे.सणासुदीच्या काळात लोकांना बसेसच्या कमतरतेचा सामना करावा लागतो आणि महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर बसेस तुडुंब भरलेल्या असतात.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्याचा विस्तार करण्यासाठी ३ हजार नवीन बस खरेदी करण्याची पूर्ण केली आहे.यातील पाच नवीन बस राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या कोपरगाव बस आगारास आल्या आहेत.दरम्यान कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत आणि जनमंगल ग्रामविकास संस्थेने तळेगाव दिघे मार्गे कोपरगाव ते संगमनेर या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नवीन बस सुरू करण्याची मागणी केली होती.तर जवळके,सायाळे मार्गे शिर्डी-नाशिक व श्रीरामपूर – पिंपळगाव बसवंत बस सुरू करण्याची मागणी केली होती.त्यासाठी मुंबई,नाशिक,अहिल्यानगर येथील वाहतूक अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता.त्यासाठी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमांतून मुंबई येथील विभागीय नियंत्रक यांचेकडे सदर बस सुरू करण्याची शिफारस केली होती.त्यानुसार मुंबई येथील कार्यालयाने नगर येथील कार्यालयास सदर बस सुरू करण्याचे आदेश नुकतेच दिले होते.त्या नुसार सदर बस कोपरगाव येथील परिवहन मंडळाचे आगार प्रमुख अमोल बनकर यांनी सुरू केली आहे.
सदर बस सुरू केल्यानंतर पहिल्याच फेरीत जवळके येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,गोरक्षनाथ वाकचौरे,प्रकाश थोरात,नानासाहेब थोरात,रामनाथ थोरात,निवृत्ती बढे,बाळासाहेब रा.थोरात,अरुण थोरात,नामदेव शिंदे,विजय शिंदे,गणेश विश्वनाथ थोरात,रावसाहेब थोरात,पोपट पाचोरे,गोरक्षनाथ थोरात,दशरथ सरवार,अनिल वाणी,अर्चना थोरात,भाऊसाहेब थोरात,संजय माळी,आदींनी जोरदार स्वागत केले आहे.त्यावेळी या नवीन बसचे चालक व वाहक यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने संतोष थोरात यांनी शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे.
दरम्यान या बसचे शेतकरी संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,माजी उपभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,दत्तात्रय थोरात,बाळासाहेब थोरात,नवनाथ थोरात,नवनाथ शिंदे,गोरक्षनाथ शिंदे,माजी उपसरपंच डी.के.थोरात,अशोक शिंदे,रखमा वाकचौरे,उत्तमराव थोरात,मीना विठ्ठल थोरात,संदीप थोरात,गोविंद थोरात,गणेश थोरात आदींनी स्वागत केले आहे.