दळणवळण
…’या’ शहरानजीक लग्नकोंडी,पोलिसांची दमछाक !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
आज लग्न तिथीचा मोठा मुहूर्त असल्याने सर्वच नागरिकांनी घराच्या बाहेर आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने काढल्याने कोपरगाव शहराच्या दक्षिणेस साधारण अडीच कि.मी.अंतरावर असलेल्या पुणतांबा फाटा येथे आज सकाळ पासून वाहनांनी मोठी गर्दी केली असल्याने आज नगर-मनमाड मार्गावर लग्न कोंडी झाली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंना तीन-तीन कि.मी.वाहनाच्या लांबच लांब रांगा आढळून आल्या असून अनेकांचा लग्न मुहूर्त हुकुन गेला असल्याचे दिसून आले आहे.तर ही वाहतून कोंडी काढण्यास शहर पोलिसांना तब्बल पाच तास मोठी यातायात करावी लागली असल्याचे दिसून आले आहे.

या लग्न कोंडीमुळे अनेकांना आपल्या मोटार सायकली काढता येईना.त्यामुळे अनेक महिला आणि मुले यांना पायपीट करावी लागली आहे.ही वाहतूक अनियंत्रित व्हायला कारण रस्त्याचे रेंगाळलेले कामही कारणीभूत असल्याने व संबधित ठेकेदार रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे तसदी घेताना दिसत नाही.परिणामी या मार्गावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे.अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.तर आर्थिक नुकसान वेगळेच आहे.
हजारो वर्षांपासून,विवाह हा भारतीय आणि जागतिक समाजात एक महत्त्वाचा सामाजिक संस्था म्हणून अस्तित्वात आहे.तो केवळ दोन आत्मीय जोडप्यांचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांचेही मिलन दर्शवतो.यामुळे व्यक्तींना त्यांच्या वंशावळीचे संगोपन करता येते आणि एक चिरस्थायी वारसा मागे सोडता येतो.भारतात,विशेषतः,विवाह एका सामाजिक संस्थेच्या पलीकडे जातो,कारण लाखो लोकांसाठी तो पवित्र आणि धार्मिक कर्तव्य मानला जातो.लग्न हे अनेक व्यक्तींसाठी कुटुंब वाढवण्याचा एक चांगला आणि वैधानिक मार्ग आहे.मुलांचे आणि भावी पिढ्यांचे संगोपन करण्यासाठी हे एक प्रेमळ आणि सुरक्षित ठिकाण आहे आणि आधुनिक युगात तुमच्या कुटुंबाचा वंश पुढे चालू ठेवते.त्यामुळे ही परंपरा अव्याहत पणे सुरू आहे.लग्नासाठी या महिन्यात अनेक मुहूर्त असून त्यासाठी अनेक जण आग्रही असल्याचे आजही दिसून येत आहे.त्यामुळे विशिष्ट दिवशी या लग्नाचा खास मुहूर्त असल्याने त्या दिवशी अनेकांना इच्छा असो वा नसो मात्र त्यास जाणे अपरिहार्य ठरत असते.या महिन्यात अजून १८,१८,२२,२३,२४,२७,२८ या लग्न तारखा असल्याने या मार्गावर गर्दी होणार हे उघड आहे.आजही त्याची प्रचीती आली आहे.त्यामुळे ऊन,वारा,थंडी आणि पावसाची तमा न बाळगता अनेकांना असाच मोठा लग्न मुहूर्त असल्याने सहकुटुंब बाहेर पडावे लागले आहे.परिणामी आज नगर-मनमाड आणि कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले आहे.परिणामी सकाळी १० वाजे पासून या गर्दीला सुरुवात झाली होती.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसांना पुणतांबा या चौफुलीवर धाव घ्यावी लागली आहे.ट्रॅफिक पोलिसांना ही गर्दी न आवरल्याने आधी पोलिस उपनिरीक्षक व नंतर थेट पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना धाव घ्यावी लागली आहे.तरीही ही गर्दी नियंत्रणात आली नाही.त्यामुळे जवळपास निम्मे पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी या कामास जुंपून घेतले असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे,दिपक रोठे,संजय पवार आदिसह पोलिस कर्मचारी गणेश काकडे आदीसह जवळपास डझनभर पोलिस कर्मचारी या कामात गुंतले असल्याचे दिसून आले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान तिकडे कोपरगावच्या दक्षिणेस शिर्डीच्या बाजूस तीन चारी (साई सृष्टी मंगल कार्यालया पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तर इकडे कोपरगाव बेटा पर्यंत (शुक्राचार्य मंदिर चौका पर्यंत) या रांगा आढळून आल्या आहेत.त्यामुळे अनेकांना आपल्या मोटार सायकली काढता येईना.त्यामुळे अनेक महिला आणि मुले यांना पायपीट करावी लागली आहे.ही वाहतूक अनियंत्रित व्हायला कारण रस्त्याचे रेंगाळलेले कामही कारणीभूत असल्याने व संबधित ठेकेदार रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे तसदी घेताना दिसत नाही.परिणामी या मार्गावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे.अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.तर आर्थिक नुकसान वेगळेच आहे.मात्र दुर्दैवाने त्याकडे कोणाचेही लक्ष असल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे,दिपक रोठे,संजय पवार आदिसह पोलिस कर्मचारी गणेश काकडे आदीसह जवळपास डझनभर पोलिस कर्मचारी या कामात गुंतले असल्याचे दिसून आले आहे.त्यांची तब्बल पाच तास दमछाक झाली असल्याचे दिसून आले आहे.मात्र तीन वाजेच्या सुमारास ही वाहतूक त्यांनी अखेर सुरळीत करण्यात यश मिळवले आहे.त्याबाबत त्यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे.