दळणवळण
बोटा-राजूर हा राज्य मार्ग त्वरित तयार करा-…यांची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अकोले तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना जोडण्यात भविष्यात अहंम भूमिका बजावणाऱ्या व तालुक्याची आर्थिक ताकद वाढविणाऱ्या बोटा ते राजूर या राज्य मार्गास केंद्र सरकारने त्वरित दुपदरी करण्याची मागणी शिर्डीचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली आहे.
महाराष्ट्रातील महामार्ग म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या राज्यात किंवा राज्यातून अन्य राज्यांत जाणारे महामार्ग.हे मार्ग राज्यातील मुख्य शहरे,जिल्हा मुख्यालये,तीर्थक्षेत्रे व तालुका मुख्यालयांना जोडतात.काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाना सुद्धा जुळले गेले आहेत व त्यामुळे ते इतर रा़ज्यांतील शहरांना अथवा गावांना जोडतात.महाराष्ट्र राज्यात एकूण १८ राष्ट्रीय महामार्ग आणि बरेच राज्य महामार्ग आहेत.या सर्व महामार्गांची एकूण लांबी ३३,७०५ कि.मी.इतकी आहे.तरीही अद्याप बरेच राज्य मार्ग विकसित झालेले नाही त्यामुळे नागरिक,भाविकभक्त आदींचा मोठा वेळ जाऊन मोठे जीवित व आर्थिक नुकसान होत आहे.त्यातील बोटा ते राजूर हा मार्ग असून त्याकडे कोणाचे हि लक्ष गेले नाही असे दुर्दैवाने दिसत आहे.ती उणीव शिर्डीचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भरून काढली आहे.त्यांनी नुकतेच केंद्रीय रस्ते वहातूक मंत्री नितीन गडकरी यांचे या प्रकरणी निवेदन पाठवुन लक्ष वेधून घेतले आहे.
त्यात त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,”अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अ.नगर जिल्ह्याचा टोकाचा एक तालुका आहे.महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई,भंडारदरा धरण,निळवंडे धरण आणि प्रवरा नदी हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे.रतनगड,मदनगड,कुलंग,आजोबागड,बितनगड,पाबरगड,हरिश्चंद्रगड यांसारखे किल्ले,महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी,शहाजी महाराज यांचा निवास झालेला पेमगिरीचा किल्ला आदी ठिकाणे अकोले तालुक्यात आहेत.अकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे.या स्थळी प्रभू रामचंद्रांची अगस्ती मुनींशी भेट झाली असे मानले जाते.या तालुक्यातल्या रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.या शिवाय काश्मीरला लाजवील असे निसर्ग सौंदर्य येथे दडले आहे.मात्र हे रस्त्यांच्या अभावामुळे पर्यटकांपासून दडले आहे त्यासाठी हा तालुका पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी राज्यमार्गानी जोडणे गरजेचे बनले आहे.
दरम्यान त्यात पुणे-नाशिक,कल्याण-नगर,नाशिक-मुंबई,कोल्हार घोटी,आदी चार महामार्ग जोडले जाऊन अकोले ते मुंबई हे अंतर ४५ कि.मी.नीं कमी होणार असून मुंबई नाशिक राष्ट्रिय महामार्गावरील गर्दी व दळणवळणांचा प्रश्न कमी होणार असल्याचा दावा केला आहे.संगमनेर-कल्याण हे अंतर ४० कि.मी.ने तर अकोले कल्याण,शिर्डी-मुंबई,शिर्डी-कल्याण हे अंतर ४० कि.मी.तर कोपरगाव-मुंबई हे २० कि.मी.कमी होणार असल्याचा दावा केला आहे.या शिवाय औद्योगिक,कृषी व दुग्ध मालवहातूकिस येणारा खर्च ३० टक्यांनीं कमी होणार आहे.तर पर्यटनातून राज्य व केंद्रास मोठा महसूल व स्थानिक ग्रामस्थांना रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण होणार हि बाब वेगळीच आहे.तरी केंद्र सरकारने हा राज्य मार्ग तातडीने मंजूर करावा अशी मागणी हि माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शेवटी केली आहे.या मागणीचे अकोले,संगमनेर,कोपरगाव,श्रीरामपूर,नेवासा,राहाता तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे.