पर्यटन व तीर्थक्षेत्र
कोपरगाव मतदार संघातील…या देवस्थानासाठी २.५० कोटीचा निधी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील देवस्थानांच्या विकासासाठी २ कोटी ५० लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
“मतदार संघातील मंजूर येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान (४९.९७ लाख),ब्राम्हणगाव येथील श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान (४९.९६ लाख), कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान (४९.९९ लाख), राहाता तालुक्यातील वाकडी येथील श्री खंडोबा देवस्थान (४९.९४ लाख) व कान्हेगाव येथील श्री नरहरी देवस्थान (४९.९८ लाख) या देवस्थानांचा समावेश असून या सर्व देवस्थानांना प्रत्येकी २५ लाख या प्रमाणे १ कोटी २५ लाख रुपये निधी आणला आहे”-आ.आशुतोष काळे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात अनेक पौराणिक व ऐतिहासिक स्थळे आहेत.व ती या भागातील भाविकांची श्रध्दास्थळे आहेत.या देवस्थानांच्या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यकम होत असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होत असते.मात्र या देवस्थानाच्या ठिकाणी सोयी सुविधांची वाढ करण्यासाठी आ.काळे यांचा या देवस्थानांच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील मंजूर येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान (४९.९७ लाख),ब्राम्हणगाव येथील श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान (४९.९६ लाख), कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान (४९.९९ लाख), राहाता तालुक्यातील वाकडी येथील श्री खंडोबा देवस्थान (४९.९४ लाख) व कान्हेगाव येथील श्री नरहरी देवस्थान (४९.९८ लाख) या देवस्थानांचा समावेश असून या सर्व देवस्थानांना प्रत्येकी २५ लाख या प्रमाणे १ कोटी २५ लाख रुपये निधी परिसर सुशोभीकरणासाठी मंजूर करून आणला आहे.
यापूर्वी विविध देवस्थानासाठी ३.१९ कोटी निधी आ.काळे यांनी आणला असून पुन्हा एकदा २ कोटी ५० लाख निधी आणला आहे.त्यामुळे मागील काही वर्षापासून विकासापासून उपेक्षित असणाऱ्या देवस्थानांचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सबंधित देवस्थान असलेल्या गावातील नागरिकांमध्ये व पंचक्रोशीतील नागरिक भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या देवस्थानाच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार,माजी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ,माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,माजी पर्यटन राज्य मंत्री ना.अदिती तटकरे यांचे आ.काळे यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.