जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

….या ठिकाणी श्री गंगागिरीजी महाराज पुण्यतिथी होणार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   श्री क्षेत्र सरला बेटाचे संस्थापक व “लेने को हरीनाम, देने को अन्नदान । या आध्यात्मिक मंत्राची इंग्रज राजवटीत घोषणा करून उपाशी पोटी असलेल्या दुष्काळी ग्रामस्थांमध्ये चैतन्य फुलवणारे थोर संत योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांची १२३ वी पुण्यतिथी गुरुवार दि.१८ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र सरला बेट येथील गोदाधाम येथे बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.या पुण्यतिथीचा अहिल्यानगर,नाशिक,छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

योगिराज सदगुरु श्री गंगागिरीजी महाराज.

 

वैजापूरमध्ये सुरू झालेली त्यांची सप्ताहाची परंपरा आजतागायत सुरू आहे आणि धर्म-संस्कृतीच्या बळकटीसाठी महत्त्वाची मानली जाते.शिर्डी येथील संत साईबाबांनी त्यांना ‘तेजस्वी हिरा’ म्हटले होते,असे म्हटले जाते.त्यांनी समाजाला स्वावलंबन,कष्टाळूपणा आणि नैतिक मूल्यांवर भर देत शिक्षण व  मार्गदर्शन केले होते.

  संत श्री गंगागिरीजी महाराज यांचा जन्म:१९०६, मणदुरे,सातारा या ठिकाणी झाला होता.हे नाथ संप्रदायाचे एक महान सिद्धयोगी आणि संत होते.ज्यांनी योग,अध्यात्म आणि स्वयंशिस्त यातून जीवनात समाधान मिळवण्याचा तत्कालीन समाजाला संदेश दिला.ते अखंड हरिनाम सप्ताहासाठी आणि त्यांच्या योगसामर्थ्यासाठी प्रसिद्ध आहेत.त्यांनी वैजापूर येथे सुरू केलेला सप्ताहाचा परंपरा आजही मोठ्या उत्साहाने सुरू आहे,विशेष म्हणजे त्याची जागतिक गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे.

    योगिराज सदगुरु श्री गंगागिरीजी महाराज यांची १२३ वी पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व तुकाराम महाराज गाथा भजन आदी धार्मिक उपक्रम मिती मार्गशीर्ष कृ ।। ०८ शके १९४७, शुक्रवार दि. १२ डिसेंबर २०२५ ते मार्गशीर्ष कृ ।। ३० शके १९४७,शुक्रवार दि.१९ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होत आहे.

   त्यानिमित्त सरला बेट या ठिकाणी मंदिरात पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,दुपारी २ ते ४ तुकाराम महाराज गाथा भजन,सायंकाळी ४ ते ४.३० प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,रात्री ७ ते ९ हरी कीर्तन संपन्न होणार आहे.
तर गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांचे गुरुवार दि.१८ डिसेंबर २०२५, सायंकाळी ४ वा पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त हरीकीर्तन तसेच शुक्रवार दि.१९ डिसेंबर २०२५,सकाळी १० वाजता सुश्राव्य काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी सर्व धार्मिक कार्यक्रमाचा नगर,नाशिक,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


  दरम्यान या पुण्यतिथी निमित्ताने अन्नदान सेवा सकाळी सोमनाथ बारसे,विरगांव-वैजापूर समस्त ग्रामस्थ,वाहेगांव,प. पू. गुलाबगिरीजी महाराज (शिवशक्ती आश्रम,नांदगांव) व समस्त ग्रामस्थ नांदगांव,कांगोणी ता.वैजापूर,बरखेड,रामभाऊ पेहेकर येसगांव, ता.गंगापूर समस्त ग्रामस्थ थोर वाघलगांव ता.वैजापूर,समस्थ ग्रामस्त देवठाण,भायखेडा, गारखेडा,भुलेगांव,ता.येवला,समस्त ग्रामस्थ जवळके ता.कोपरगांव,समस्त ग्रामस्त मुठे वाडगांव ता.गंगापूर,फराळ पंगत समस्त ग्रामस्थ,लाडगांव,जांबरगांव,घायगांव,ता. वैजापूर,जगन्नाथ चंद्रभान लुटे (शिर्डी),भास्कर नारायण दिघे,गोपीनाथ भावराव क्षिरसागर, तळेगांव दिघे ता.संगमनेर समस्त ग्रामस्थ उक्कडगांव ता.कोपरगांव,समस्त ग्रामस्थ, गवंडगांव ता.येवला,नारायणपूर ता.वैजापूर,जगन्नाथ चंद्रभान झिने,हिंगोणी ता.नेवासा राजेंद्र सिताराम शेळके,वाकडी,समस्त ग्रामस्थ,रामपूर ता.श्रीरामपूर साहेबराव शिंदे, हरिभाऊ फकिरा गागरे,राजेश बाबुलाल कोळेकर,गोटु शेठ नारायण परसराम गागरे,विठ्ठल बबन कासार,वांजरगांव समस्त ग्रामस्थ आडगांव चोथवा व हनुमानवाडी,धामोडे,कोटमगांव, देवीचे कोटमगांव विठोबाचे ता.येवला समस्त ग्रामस्थ शिंगी,प्रिप्री,नरहरी रांजणगांव,अकोली वाडगांव काटे पिंपळगांव,येसगांव ता.गंगापूर, समस्थ ग्रामस्त,पढेगांव,वारी,शिंगवे,सडे, आपेगांव तिळवणी,शिरसगांव,ता.कोपरगांव, एकनाथ खेमनार,सुरेश गलांडे.उंदिरवाडी ता. श्रीरामपूर,समस्त ग्रामस्थ पिंपळगांव फुणगी, गणेगांव ता. राहुरी आदींसह विविध गावातील भजनी मंडळ व कार्यकर्ते करणार आहेत.

   दरम्यान या धार्मिक कार्यक्रसाठी सद्गुरु श्री योगिराज गंगागिरीजी महाराज भक्त मंडळ आदीसह,विविध गावातील दाते,परिसरातील भजनी मंडळाचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती श्री सदगुरू.
श्री योगिराज गंगागिरीजी महाराज संस्थानचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त,ग्रामस्थ आदींनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close