जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

नाशिककरांच्या प्रेमाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर बरसात

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


नाशिक-(किरण घायदार )


  राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले.प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला.प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर झाल्याचं चित्र आज सगळीकडे पाहायला मिळाले आहे.

सदर प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बाल वारकऱ्यांच्या समावेश असलेल्या दिंडीने विशेष लक्ष वेधले. आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य,पंजाबी नृत्य,अशा विविध पद्धतीने आणि विविध रंगी वेशभूषा करून नागरिकांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले आहे.

सकाळी ठीक १०-३० वाजता प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे निलगिरी बाग हेलिपॅड येथे आगमन झाले.त्यानंतर हॉटेल मिर्ची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून त्यांच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासमवेत होते.

नाशिकच्या युवा वर्गाने केलेली गर्दी,महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद,दुतर्फा सजलेले रस्ते अशा वातावरणात तपोवनाच्या दिशेने निघालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी या आपुलकी आणि प्रेमाने केलेल्या स्वागताचा अनुभव आला.उपस्थितांच्या दिशेने हात उंचावत तसेच उपस्थितांना अभिवादन करत प्रधानमंत्री श्री.मोदी यांचा ताफा तपोवन कडे निघाला.जागोजागी हजारोंच्या संख्येने थांबलेले नाशिककर आपल्या प्रधानमंत्र्यांचे स्वागत उत्साहात करत होते.

  सदर प्रसंगी लेझिम पथक,ढोलपथक,पारंपरिक वाद्ये यांच्या साहाय्याने आणि नृत्य करत विविध पथके या मार्गावर प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत करत होती.प्रधानमंत्री श्री.मोदी यांना जवळून पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.लेझिम पथक,ढोल पथक आणि विविध वेशभूषेतील युवक युवतींनी सारा परिसर जणू चैतन्याने भरून गेला होता.प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने परिसरातील वातावरण चैतन्याने भारून गेले.हॉटेल मिर्ची ते तपोवन पर्यंतचा संपूर्ण रस्त्यावर केवळ आणि केवळ अमाप उत्साह,चैतन्य, आनंदाचे वातावरण होते. हातात तिरंगा घेऊन आणि भगवे झेंडे हाती घेत युवकांनी प्रधानमंत्री श्री मोदी यांचे स्वागत केले.त्याचबरोबर विविध ठिकाणच्या युवा मंडळांनी मल्लखांब प्रात्यक्षिके, पारंपरिक कलांचा आविष्कार यावेळी सादर केला.


सदर प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बाल वारकऱ्यांच्या समावेश असलेल्या दिंडीने विशेष लक्ष वेधले. आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य,पंजाबी नृत्य,अशा विविध पद्धतीने आणि विविध रंगी वेशभूषा करून नागरिकांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली गंगापूजनसह महाआरती

दरम्यान दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गंगापूजन करून रामतीर्थ येथे दर्शन घेत विधीवत पूजा व आरती केली.भारत विश्वगुरू होऊ दे,असा संकल्प त्यांनी यावेळी केला.


यावेळी गंगा पुरोहित संघाच्या वतीने अध्यक्ष व विश्वस्त यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चांदीचा अमृत कलश,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शंकर शुक्ल,दिलीप शुक्ल,चंद्रशेखर पंचाक्षरी,प्रतिक  शुक्ल,वैभव दिक्षित,चंद्रशेखर  गायधनी,शेखर  शुक्ल,अतुल गायधनी,अमित पंचभैये,वैभव बेळे,भालचंद्र शौचे,उपेंद्र देव आदीसह पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ऐतिहासिक काळाराम मंदिरातील भगवान श्रीरामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली.

यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री श्री.मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8 व्या अध्यायाचे (श्लोकांचे) ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, त्याचे वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री महोदयांनी संवाद साधला.

स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री मोदी यांचे अभिवादन

मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close