जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोरोनासाठी माजी सैनिकांचे मोलाचे सहकार्य-कौतुक

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर देखील या बाधित रुग्णांपासून होणारा संसर्ग हा शून्य टक्के आहे. हि अतिशय समाधानाची गोष्ट असली तरी प्रशासनाच्या मदतीला माजी सैनिकांनी केलेल्या मदतीमुळे कोरोनावर वर्चस्व मिळविण्यात माजी सैनिकांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव शहरात व तालुक्यात कोरोनाचे काही रुग्ण आढळले असले तरी त्यापासून होणारा संसर्ग रोखण्यात तालुका प्रशासनाने पोलिसांच्या माध्यमातून नियंत्रण मिळवले आहे.त्यांना या कामी पोलिसांवरचा भार कमी करण्यासाठी कोरोना योद्धा बनून माजी सैनिकांनीं मोलाची भूमिका निभावली आहे.त्यांचा सत्कार नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला.

कोपरगाव शहरात व तालुक्यात कोरोनाचे काही रुग्ण आढळले असले तरी त्यापासून होणारा संसर्ग रोखण्यात तालुका प्रशासनाने पोलिसांच्या माध्यमातून नियंत्रण मिळवले आहे.त्यांना या कामी पोलिसांवरचा भार कमी करण्यासाठी कोरोना योद्धा बनून माजी सैनिकांनीं मोलाची भूमिका निभावली आहे.त्यांचा सत्कार नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल होन,उपाध्यक्ष राघवेंद्र वाडेकर,संघटक युवराज गांगवे व सर्व सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल होन,उपाध्यक्ष राघवेंद्र वाडेकर,संघटक युवराज गांगवे व सर्व सदस्य उपस्थित होते.त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोरोना संकटाच्या काळात कोरोनाचा पार्दुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत होते.मात्र एवढ्या मोठ्या वैश्विक संकटाचा सामना करतांना पोलिसांची कुमक कमी पडत असल्यामुळे साहजिकच पोलिसांवरचा ताण वाढला होता.अशावेळी देशाप्रती कर्तव्याची जाणीव असणाऱ्या माजी सैनिक रस्त्यावर उतरून पोलिसांच्या मदतीला धावून आले व या कोरोना विरोधातल्या या लढाईत सामील होऊन कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढू दिला नाही.सैन्यात आपली सेवा पूर्ण केल्यानंतरही मोठ्या संकटात जेव्हा-जेव्हा देशाला गरज पडते तेव्हा सैनिक देशासाठी धावून येतात. सीमेवर लढत असलेले सैनिक असो किंवा देशभरात कोरोनाशी लढत असलेले माजी सैनिक असो सैनिकांचे आपल्यावर असंख्य ऋण आहे. माजी सैनिकांनी कोरोना संकटात दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याची समाजाला जाणीव व्हावी यासाठी माजी सैनिकांचा गौरव केला असल्याचे आ. काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close