जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

खोका शॉपसाठी उद्या नगरला बैठक -नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांलगत व्यावसायिक गाळे किंवा खोका शॉप बांधण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी सहाय्यक संचालक,नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग,अहमदनगर यांच्या भेटीसाठी वेळ मिळाला असून इच्छुकांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

कोपरगाव शहरात १० मार्च सन-२०११ रोजी शहरातील अतिक्रमणे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत हटविली.त्यात सुमारे दोन हजाराहुन अधिक नागरिकांची रोजी रोटी हिसकावली गेली त्या वेळेपासून हा प्रश्न प्रत्येक निवडणूक पाहून राजकीय नेते आपल्या मतपेट्या भरण्यासाठी वापरत आहे.आता उद्याच्या बैठकीकडे विस्थापित नागरिकांचे लक्ष लागून आहे.

कोपरगाव शहरात १० मार्च सन-२०११ रोजी शहरातील अतिक्रमणे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत हटविली.त्यात सुमारे दोन हजाराहुन अधिक नागरिकांची रोजी रोटी हिसकावली गेली त्या वेळेपासून हा प्रश्न प्रत्येक निवडणूक पाहून राजकीय नेते आपल्या मतपेट्या भरण्यासाठी वापरत आहे.मात्र कोणीही हा प्रश्न ऐरणीवर घेतला नाही.आता जवळपास सर्वच विस्थापित परागंदा झाले असताना ह विषय नगराध्यक्ष वहाडणे यांनी हातात घेतला असून त्यासाठी सम्बधीत अधिकाऱ्यांची वेळ घेतली आहे.

यात सर्व पक्षांचे गटनेते,उपनगराध्यक्ष व व्यावसायिकांचे शिष्टमंडळ बुधवार दि.२४ फेब्रुवारी रोजी जाणार आहे. दुपारी ०२ वाजता भेटीची वेळ मिळालेली आहे.संबंधितांनी उद्या ०२ वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल,पहिला मजला,आकाशवाणी केंद्राजवळ अहमदनगर येथे उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवये नुकतेच केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close