जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

देश सुखी ठेवण्यासाठी सक्षमांनी अग्रेसर व्हावे-सावंत

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )


कोणत्याही बालकास आजार होणार नाही असा समाज निर्माण करण्याची वर्तमानात गरज आहे.शारीरिक दृष्ट्या सक्षम माणसांनी हिरहीरीने सहभाग घेवून दिव्यांगांना सक्षम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रमेश सावंत यांनी एका कार्यक्रम प्रसंगी केले आहे.

“दिव्यांगांचे २१ प्रकार असून त्याची ७ प्रकोष्ठात विभागणी केली आहे.थॅलेसेमिया हा अनुवांशिक आजार आहे.त्याचे समुळ उच्चाटन करायचे आहे”-डॉ.अंजली केवळ,ऋतुजा फाऊंडेशन.

   समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ (सक्षम) अंतर्गत उत्तर नगर जिल्हा अधिवेशन संत सेना नाभिक समाज मंगल कार्यालय कोपरगांव येथे रविवारी दिव्यांग शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.या अधिवेशनास उत्तर नगर जिल्ह्यातील दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहांकितचे श्रीकांत बागुल हे होते.

  सदर कार्यक्रमास जेष्ठ स्वयंसेवक रमेश सावंत,ऋतुजा फाउंडेशनच्या डॉ.अंजली केवळ,आंतरराष्ट्रीय लेखक सुरेश कोल्हे,सक्षमचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत साळुंके,सचिव भास्करराव जाधव,सहसचिव सचिन क्षीरसागर,सतिष निकम,महिला प्रमुख स्नेहाताई कुलकर्णी,आनंद वाघ,सचिन पोटे,समन्वयक गोकुळ पावडे,पुरुषोत्तम वायकुळ,मुकुंद काळे,ह.भ.प.दवने महाराज,ह.भ.प.नानासाहेब शिंदे महाराज,बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. 

या प्रसंगी प्रमुख वक्ते रमेश सावंत पुढे म्हणाले,”माणसामध्ये संवेदनशीलता असायला हवी.जो तन्मयतेने समाजाशी समरस होतो तेव्हा त्याला तेथील दु:ख कळते.संस्कार करणारा चांगला कार्यकर्ता होवू शकतो असे सांगत मोठे पणासाठी काम करु नकाअसे आवाहन शेवटी केले आहे.

आंतरराष्ट्रीय लेखक सुरेश कोल्हे म्हणाले की,”आपणच आपल्याला जपायला हवे.आपण या निर्दयी जगात जगतो आहोत हेच आपले सामर्थ्य असल्याचे सांगत शेरोशायरी करुन श्री साईबाबा यांचे जीवनावर कविता सादर केली.

कालांश उद्योजिका रेणुका काले,तहसिलचे वरिष्ठ लिपिक राजेंद्र चौरे,आय.डी.बी.आय.बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक अजय तांबे या दिव्यांगांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सदर अधिवेशनाचा प्रारंभ भारतमाता व लुई ब्रेल यांचे प्रतिमापुजनाने झाला.सचिन क्षीरसागर यांनी सक्षम गीत सादर केले.उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक भास्करराव जाधव तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्रीकांत साळुंके यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close